...तर जळगाव जिल्ह्यात लसीकरणासाठी अजून दीड वर्ष लागणार

Jalgain Vaccinatin News: जिल्ह्यात जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरवात झाली. कोरोना लसीकरणाचा प्राधान्यक्रम अगोदर ठरविला गेला.
Vaccinatin
VaccinatinVaccinatin


जळगाव ः जिल्ह्यात कोरोना लस (corona vaccine) घेणाऱ्यांची संख्या पावणेदहा लाखांवर पोचली असली तरी अजून तब्बल सुमारे ३० लाख जणांचे लसीकरण बाकी आहे. लसीकरणाची गती पाहता अशाच पद्धतीने लसीकरण (Vaccination) सुरू राहिले, तर अजून दीड वर्ष सर्वांना लसीकरणासाठी लागेल, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. यामुळे लशींचा पुरवठा अधिकाधिक जिल्ह्यास मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन ( Jalgaon District Administration), पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच आगामी सहा महिन्यांत सर्वांना लसीकरण होईल.

(jalgaon district corona vaccination slow)

Vaccinatin
हरताळा,पातोंडा,ऐणगाव या गावांचा`रुरबन`अंतर्गत होणार विकास

जिल्ह्यात जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरवात झाली. कोरोना लसीकरणाचा प्राधान्यक्रम अगोदर ठरविला गेला. त्यात फ्रंटलाइन वर्करांना लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, इतर स्टाफचा सामावेश होता. त्यानंतर पोलिस, महसूल विभागाला प्राधान्य दिले गेले. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरणास सुरवात झाली. सर्वच केंद्रांवर लशींचा तुटवडा असला तरी तासन् तास रांगेत उभे राहून लस घेण्यासाठी या वयोगटातील नागरिकांनी धडपड केली. अनेकांनी पहाटेपासून लसीकरणासाठी रांगा लावल्या.


त्यानंतर १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण सुरू झाले. या वेळी सर्वच केंद्रांवर तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी, गोंधळ झाला. यातून कोरेानोचा संसर्ग आणखी वाढू शकेल. यामुळे शासनाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली. ज्यांची नोंदणी झाली, त्यांनाच लसीकरण झाले. यामुळे ज्यांची लसीकरणाची तारीख वेळ निश्चित झाली तेच लसीकरण केंद्रावर दिसू लागले. ज्येष्ठ नागरिक व १८ ते ४५ वयोगटातील लस घेणाऱ्यांची संख्या व लशींचा पुरवठा पाहता रोजच अनेक जण लसीकरणाविना परत जाऊ लागले. यामुळे आणखी गोंधळ वाढला. परिणामी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करावे लागले. ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्यात आली. महिनाभरानंतर १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण ऑनलाइन सुरू झाले. आता ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने लसीकरण सुरू आहे. असे असले तरी लशींचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण केंद्रे वारंवार बंद ठेवावी लागत आहेत.
याकडे जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा अजून दीड वर्ष तरी सर्वांना लसीकरणास लागतील.

Vaccinatin
भारतातील ही आहे बेस्ट वाॅटर पार्क; जीथे आहे फक्त मनोरंजन,आनंद


लसीकरण झालेले नागरिक असे
* आरोग्य कर्मचारी--५० हजार ९९१
* फ्रंटलाइन वर्कर---८९ हजार ३४४
* १८ ते ४५ वयोगटातील--दोन लाख १३ हजार ५६१
* ४५ ते ६० वयोगटातील--तीन लाख १३ हजार १५६
* ६० वयोगटावरील -- तीन लाख सहा हजार ८५६
* पहिला डोस घेतलेले-- सात लाख ४६ हजार ७९२
* दुसरा डोस घेतलेले-- दोन लाख २७ हजार ११७

* एकूण लसीकरण--नऊ लाख ७३ हजार ९०८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com