एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी; कापूस, कांदा पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crop damage

एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी; कापूस, कांदा पिकांचे नुकसान

एरंडोल: तालुक्यात आज पहाटे सर्वत्र अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्यामुळे पिकांचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे अंजनी प्रकल्प (Ajani Dam) पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे प्रकल्पाच्या तीनही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यामुळे अंजनी नदीला पूर (Flood) आला. अवकाळी पडलेल्या पावसामुळे शहरातील सर्व सखल भागात पाणी साचले तर नवीन वसाहतींमधील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले होते.

हेही वाचा: जळगावः कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांत जल्लोष


एरंडोल तालुक्यात आज पहाते दीड ते दोन वाजेच्या सुमारास सर्वत्र अतिवृष्टी झाली. अवकाळी पडलेल्या पावसामुळे कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.अंजनी प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के झाला. प्रकल्पातील पाण्याची पातळी २२५.९१ मीटर झाल्यामुळे आज सकाळी साडेसात वाजता प्रकल्पाचे तीनही दरवाजे पाच सेंटीमीटर उघडण्यात आल्यामुळे प्रकाल्पातीन सुमारे सातशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीच्या पात्रात करण्यात आला.प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे अंजनी नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी पूर पाहण्यासाठी नदीकाठी गर्दी केली होती.अंजनी नदीला पूर आल्यामुळे पात्रातील सर्व घाण वाहून गेली असून नदीचे पात्र काही प्रमाणात स्वच्छ झाले आहे.तालुक्यात तीन तासात एरंडोल येथे १०१, कासोदा येथे६६,रिंगणगाव येथे ८१ तर उत्राण येथे ३५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.पहाटे अचानक जोरदार पाउस सुरु झाल्यामुळे नागरिकांची एकाच धांदल उडाली.पावसामुळे कापूस आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली.शहरात रस्त्याची कामे सुरु असल्यामुळे सर्व खोदलेल्या रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले होते.तसेच राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे धरणगाव चौफुली येथे बांधण्यात येणा-या उड्डाणपुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात सर्वत्र पाणी तुंबले होते.

हेही वाचा: नंदुरबारःशहादा येथील तरुणाचा पुणे येथे अपघाती मृत्यू

शहराबाहेर असलेल्या अनेक नवीन वसाहतींमधील रस्त्यांवर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे रहिवाशांना चालतांना तारेवरची कसरत करावी लागली.तालुक्यातील अंजनीसह भालगाव,खडकेसिम,पद्मालय येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर झाली आहे.तसेच अंजनी नदीला पूर आल्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

loading image
go to top