esakal | सलग दुसऱ्या दिवशी दिलासा..कोरोना रुग्ण शंभराच्या आत
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सलग दुसऱ्या दिवशी दिलासा..कोरोना रुग्ण शंभराच्या आत

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी नवे रुग्ण शंभराच्या (patient) आत आढळून आले. कालप्रमाणेच नवे ८० बाधित आढळले असून २४२ रुग्ण बरे झाले. एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू (corona death) झाला. (jalgaon district for two days corona patients number less than one hundred)

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९७ टक्क्यांवर


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा (corona) संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत आहे. गुरुवारी तीन महिन्यांनंतर रोजचे नवे रुग्ण शंभराच्या आत आढळून आले. शुक्रवारीही अवघे ८० रुग्ण समोर आलेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ४१ हजार ३६९ झाली आहे. दिवसभरात २४२ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३६ हजार ६८४ वर पोचला आहे. एका मृत्यूसह बळींचा आकडा २५६० झाला आहे. शुक्रवारी ५ हजार ५३३ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत.

हेही वाचा: आघाडी सरकारने खरेदी केंद्रांची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी

गंभीर रुग्ण पाचशेच्या आत
नवे रुग्ण कमी व बरे होणारे अधिक असा ट्रेंड कायम असल्याने सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांच्या टप्प्यात आहे. तर गंभीर रुग्णांची संख्याही कमी होऊन पाचशेच्या खाली आली आहे. सध्या ऑक्सिजनवरील रुग्ण २७६ व आयसीयूतील रुग्णसंख्या १४९ आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ७, जळगाव ग्रामीण व यावल तालुका प्रत्येकी ३, भुसावळ ६, अमळनेर ३, चोपडा ५, पाचोरा ८, एरंडोल, जामनेर व रावेर प्रत्येकी ४, पारोळा २, चाळीसगाव २५, मुक्ताईनगर, पारोळा प्रत्येकी २, बोदवड, धरणगाव तालुका प्रत्येकी १.

हेही वाचा: शिवसेना स्टाईलने वागा कोणी अडविणार नाही !

कोविशील्ड, कोव्हॅक्सीनचा साठा
शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध केंद्रांसाठी २० हजार १४० कोविशील्ड व १६२० कोव्हॅक्सीनचा साठा उपलब्ध होता. त्यामुळे शनिवारी पुन्हा लसीकरण सुरळीत होणार आहे. तर दिवसभरात २४३० जणांना पहिला डोस व ४०४ जणांना दुसरा डोस देण्यात आला.