जळगाव जिल्ह्याची हॅट्रीक... सलग तीन दिवस कोरोना बाधितांचा आकडा शंभरीपार ! 

जळगाव जिल्ह्याची हॅट्रीक... सलग तीन दिवस कोरोना बाधितांचा आकडा शंभरीपार ! 
Updated on

जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही शंभरी पार जात असून, हे संख्या कमी होण्यासाठी कोणतीही उपाययोजना सध्या तरी प्रशासनाच्या दृष्टिपथास आली नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आजही 130 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या ही 1526 वर पोचली आहे. रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने कोरोनाचा कहर अधिकाधिक वाढत असल्याचे दिसत आहे. 

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग मोठ्या झपाट्याने पसरत आहे. जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासन पुरते हादरून गेले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास कोरोनाबाधितांची संख्या कैक पट वेगाने वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

स्थिती हाताबाहेर 
अगोदरच उपचारासंदर्भात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहे. यातच दररोज जिल्ह्यातील बाधितांचा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा कहर सुरू झाला असून, दररोज शेकडो संशयित रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्‍यकता आता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात आज दिवसभरात आढळलेल्या 130 नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक जळगाव शहरात 20, धरणगावात 22, जामनेरमध्ये 18, रावेरमध्ये 21 जणांचा समावेश आहे. अन्य रुग्णांमध्ये जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 5, अमळनेर 3, चोपडा 15, पाचोरा 3, भडगाव 2, यावल 2, पारोळा 9, बोदवड 4 व एरंडोल येथील एकाचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com