'मे' महिन्यात पूर्वमोसमी पावसाने सहा कोटींचे नुकसान !

शेतकऱ्यांचे फळपिके सोडून बागायत पिकांखालील क्षेत्र बाधित होते
'मे' महिन्यात पूर्वमोसमी पावसाने सहा कोटींचे नुकसान !


जळगाव : जिल्ह्यात मे महिन्यात २२ ते ३१ दरम्यान विविध ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस (Pre-monsoon rains) झाला. यात केळीसह पपई, लिंबासह कांदा, वांगी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. ते पंचनामे पूर्ण झाले असून, वरील कालावधीत एकूण पाच हजार २२२ शेतकऱ्यांचे (Farmer) नुकसान झाले होते, तर तीन हजार ७०८ हेक्टरवरील सुमारे सहा कोटी ६६ लाख ९९ हजार ३६० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने (District Administration) मदत व पुनर्वसन विभागाच्या (Relief and Rehabilitation Department) प्रधान सचिवांकडे सादर केला. (jalgaon district pre-monsoon rains crore loss)

'मे' महिन्यात पूर्वमोसमी पावसाने सहा कोटींचे नुकसान !
कोरोनाची लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान शक्य !


यंदा पावसाचा चांगला अंदाज असला तरी अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. मात्र, बिगरमोसमी, पूर्वमोसमी पावसाने केळी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. २२ ते ३१ मेदरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र पूर्वमोसमी पाऊस झाला. यात फळपिके व इतर पिकांचे नुकसान झाले होते. विशेषतः रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा या ठिकाणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे सर्वच ठिकाणचे पंचनामे करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी विभागाला दिले होते. त्यानुसार पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचे फळपिके सोडून बागायत पिकांखालील क्षेत्र बाधित होते अशांना हेक्टरी १३ हजार ५००, तर ज्यांचे नुकसान फळपिकांखालील पिकांचे झाले होते, ते त्यांना १८ हजार रुपये हेक्टरी भरपाई मिळणार आहे. रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, एरंडोल या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान आहे.

'मे' महिन्यात पूर्वमोसमी पावसाने सहा कोटींचे नुकसान !
लॉकडाउनमुळे ९० टक्के गृहबांधणी प्रकल्प ठप्प

तालुकानिहाय नुकसान असे
तालुका--शेतकरी--बाधित क्षेत्र-अपेक्षित निधी
जळगाव--६०--२१.३५-- ३ लाख ८२ हजार ९५०
मुक्ताईनगर--२,५६४--२,००३--३ कोटी ६० लाख ४१ हजार ४००
भुसावळ--५९--३७.२--६ लाख ६७ हजार ८००
यावल--२९६-१०२.३४--१ कोटी ८४ लाख २ हजार १२०
रावेर--१,९००--१,३२१.०३--२ कोटी ३७ लाख ७८ हजार ५४०
बोदवड--१३--२.९९--५३ हजार ८२०
धरणगाव--१८--१७.८९--३ लाख २२ हजार २०
चोपडा--२१५--११७--२० लाख ८८ हजार ३६०
अमळनेर--१९--९--१ लाख ६४ हजार २५०
एरंडोल--७८--७५--१३ लाख ५८ हजार १००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com