esakal | जिल्‍ह्‍यात शाळांची घंटा वाजणार; पण इतकेच तास भरणार वर्ग  
sakal

बोलून बातमी शोधा

school open

उद्यापासून नववी ते अकरावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जाणार आहे. शाळेत येताना विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.

जिल्‍ह्‍यात शाळांची घंटा वाजणार; पण इतकेच तास भरणार वर्ग  

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : शासनाने दिलेल्या निर्देशानूसार जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. उद्यापासून(ता.२३) जिल्ह्यात ९ ते १२ चे वर्ग भरविण्यात येतील. त्यासाठी आज खासगी शाळा, महाविद्यालयात शाळा खोल्या र्निजंतुकरणाची मोहीम होती घेण्यात आली होती. या शाळांच्या तयारीची पाहणी शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, इतर अधिकाऱ्यांनी केली. 

उद्यापासून नववी ते अकरावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जाणार आहे. शाळेत येताना विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. पालकांचे संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गर्दी कमी करण्यासाठी अकरावी, बारावी सकाळी तर नववी व दहावीचे वर्ग दुपारी भरविण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

चार तासिका होणार 
जेवढे विद्यार्थी येतील तेवढ्यांना विज्ञान, गणित, इंगजी असे विषय शिकविले जाणार आहे. एक तास चाळीस मिनीटांचा असेल. एकूण १६० मिनीटांच्या रोज तासीका घेतल्या जातील. शिक्षकांची कोरोना टेस्टही सुरू आहे. निगेटीव्ह टेस्ट असलेल्या शिक्षकांनाच शिकविणयास सांगितले जाणार आहे. 

खासगी क्लासेसला परवानगी नाही 
अनेक जण खासगी क्लासेस घेतात. विषेशतः दहावी, बारावीचे वर्ष महित्वाचे असल्याने खासगी क्लासेस चालकांनी ऑनलाईन शिकवण्यावर भर दिला. आता शाळा सुरू होत आहेत. यामुळे खासगी क्लासेसलाही शिकवण्या घेवू द्या अशी मागणी खासगी शिकविणी चालकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्याकडे केली होती. अशी परवानगी देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. यामुळे खासगी क्लासेस बंदच राहतील. 

शासनाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टसिंग, गर्दी टाळणे, मास्क लावणे विद्यार्थ्याना बंधन कारक आहे. त्याबाबत शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. 

– अभिजीत राउत, जिल्हाधिकारी. 


संपादन ः राजेश सोनवणे