जळगाव जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ 

देविदास वाणी
Friday, 14 August 2020

जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी या सात प्रकल्पांमध्ये १०० टक्के उपयुक्त साठा आहे. भोकरबारी धरणात ७.१० टक्के उपयुक्त साठा असून, बोरी धरणाचे दोन दरवाजे ०.१० मीटरने उघडण्यात आले आहेत. 

जळगाव : जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीत चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. जिल्ह्यातील १३ पैकी सात मध्यम प्रकल्पांत १०० टक्के उपयुक्त साठा झाला आहे. हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १८.६३ टीएमसी इतका उपयुक्त साठा झाला आहे. 

हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे चार दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून, धरणातून गुरुवारी (ता. १३) नऊ हजार ४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहेत. अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे १३ मध्यम प्रकल्प आहेत, तर ९६ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५०.४० टीएमसी इतका आहे. 

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३६.२६ टीएमसी इतका असून, आजअखेर या प्रकल्पांमध्ये ५२७.७४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८.६३ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.६७ टीएमसी, गिरणा ९.२३ टीएमसी, तर वाघूर धरणात ७.७३ टीएमसी इतका उपयुक्त साठा असून, गिरणा धरणात ४९.९१ टक्के, तर वाघूर धरणात ८८.१२ टक्के इतका साठा आहे. 

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७.२० टीएमसी इतका असून, आजअखेर या प्रकल्पांमध्ये १७२.८३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६.१० टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पात १११.७६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३.९५ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. 

जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी या सात प्रकल्पांमध्ये १०० टक्के उपयुक्त साठा आहे. भोकरबारी धरणात ७.१० टक्के उपयुक्त साठा असून, बोरी धरणाचे दोन दरवाजे ०.१० मीटरने उघडण्यात आले आहेत. 

प्रकल्पाचे नाव- पाणीसाठा टक्केवारी 
अभोरा-१०० 
मंगरूळ-१०० 
सुकी-१०० 
अग्नावती-१०० 
हिवरा--१०० 
तोंडापूर-१०० 
मन्याड-१०० 
मोर- ६६.३९ 
बहुळा-९०.०० 
गूळ- ७८.०७ 
बोरी- ८३.७४ 
अंजनी- ४३.१८ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district seven medium projects daym 'overflow'

Tags
टॉपिकस
Topic Tags: