शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; आमदारांचे पालकमंत्र्यावर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena

शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; आमदारांचे पालकमंत्र्यावर आरोप


जळगाव : मी पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत (Shiv Sena) आहे. मात्र आता मी आमदार असूनही स्थानिक पातळीवर मला कोणत्याच गोष्टीसाठी विचारात घेतले जात नाही. मी पक्ष सोडून जावे, यासाठी मला पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांच्यासह स्थानिक नेते त्रास देत आहेत, असा आरोप पारोळा येथील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
जळगाव जिल्हा शिवसेनेत काही दिवसांपासून अंतर्गत वाद (internal disputes) सुरू आहे. मात्र आता हा वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
(jalgaon district shiv sena minister mla internal disputes)

शिवसेनेचे पारोळा येथील आमदार, जिल्हा बँकेचे संचालक चिमणराव पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की पक्षात मला विनाकारण स्थानिक नेते त्रास देत आहेत, मी पक्षातून बाहेर जावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे. आता पक्षाची नुकतीच नवीन पदाधिकारी नियुक्ती झाली त्यानं माझ्या तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख दिला याबाबत मला साधे विचारले नाही. वर्तमानपत्रात ही बातमी आपल्याला वाचावी लागली.

निधी देण्यात ही डावले

निधीतही पालकमंत्री गुलाबराव पाटील आपणास हेतुपुरस्सर डावलत असतात, असा आरोपही त्यांनी केला. आपला वरिष्ठ नेत्यांवर राग नाही, परंतु स्थानिक पातळीवर नेते त्रास देत आहेत, याची माहिती आता आपण वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. त्यांच्यावर वरिष्ठ नेते कारवाई करतील, याची आपण प्रतीक्षा करीत आहोत. आपण कट्टर शिवसैनिक आहोत, आपल्याला कितीही त्रास दिला तरी शिवसेना सोडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shiv Senajalgaon news