डीसीपीएस स्लिप वेबसाईट प्रसिध्द करण्यात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल 

देविदास वाणी
Thursday, 19 November 2020

जिल्हा परिषद जळगाव येथील विशेष नियुक्त पथकातील कर्मचाऱ्यांनी काम केले असून राज्याच्या कोणत्याही ठिकाणी ही माहिती शिक्षकांना शालार्थ आयडी टाकून सहज पाहता येईल.

जळगाव  : जिल्हा परिषद शिक्षकांसाठी 2005 नंतर जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती सन 2019 ते 2020 पासून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या डीसीपीएस स्लीप महाराष्ट्रात प्रसिद्ध करणारी जळगाव जिल्हा परिषद महाराष्ट्र पहिली ठरली आहे त्यामुळे 70 हजार कागदाची बचत झाली यामुळे डीसीपीएस धारकांना आपल्या खात्यातील रक्कम ऑनलाइन बघता येणार आहे.

वाचा- एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह, उपचारासाठी मुंबईला जाणार

जिल्ह्यातील 2009 - 10 पासून 2019 - 20 अखेर सर्व जिल्हा परिषद शिक्षक यांच्या डीसीपीएस स्लिप वर्षनिहाय जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत जिल्हा परिषद जळगाव येथील विशेष नियुक्त पथकातील कर्मचाऱ्यांनी काम केले असून राज्याच्या कोणत्याही ठिकाणी ही माहिती शिक्षकांना शालार्थ आयडी टाकून सहज पाहता येईल यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र खैरनार उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे विजय पवार यांच्या हस्ते या स्लीप वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या यावेळी पी सी पाटील संतोष गुरव प्रशांत होले आणि डीसीपीएस स्लीप बाबत काम करणारे कर्मचारी उपस्थित होते सदर स्लीप 2009 -10 ते 2019 - 20 पर्यंत अपलोड झालेले आहे.

काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव 
चाळीसगाव येथील सतीश सपकाळे भगवान मोरे यावल येथील संदीप पाटील योगेश इंगळे यांनी हे काम कमी वेळेत करून डीसीपीएस धारकांना दिलासा दिल्याने यावेळी त्यांचा गौरव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district tops in publishing DCPS slip website