esakal | जळगाव जिल्ह्यात २५ लाखांवर कोरोना लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

जळगाव जिल्ह्यात २५ लाखांवर कोरोना लसीकरण

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात रविवार अखेर २५ लाखांवर नागरिकांचे लसीकरण (Corona Vaccination) झाले आहे. जिल्ह्यात लशी उपलब्ध झाल्याने लसीकरणास वेग आला आहे. शहरी भागात (Urban area) दहा लाखांवर, तर ग्रामीण भागात (Rural area)१४ लाखांवर नागरिकांनी लस घेतली आहे. शहरी भागासह जिल्ह्यातील लसीकरण वेगात होण्यासाठी विशेष लसीकरण अभियान सुरू आहे.

हेही वाचा: जळगाव मनपाचं डोकं ठिकाणावर आहे का..!

कोविड संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या दुष्परिणामाचा फटका १४ लाख २७ हजारांहून अधिक नागरिकांना बसला. जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या अथक प्रयत्नातून १४ लाख १५० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. संसर्गावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून राबविली जात आहे. आरोग्य प्रशासन, फ्रंटलाइन वर्कर्स यांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण झाले आहे. त्यानंतर ४५ वर्षे वयोगटासह जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, महावितरण, विद्यापीठ प्रशासन अन्य सर्वसामान्य नागरिक तसेच १८ वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात आलेल्या लस मात्रेनुसार ऑगस्टपर्यंत केवळ नऊ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले होते. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभाग पातळीवर आवश्यक प्रमाणात लस मात्रेच्या पुरवठ्याची मागणी केल्यानुसार लस मात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहे. गेल्या महिन्यात २० लाख २१ हजार ७४५ नागरिकांचे लसीकरण झाले होते. आता तीच संख्या २५ लाखांवर गेली आहे.

तालुकानिहाय लसीकरण असे :

तालुका - लस घेतलेले नागरिक


* अमळनेर--एक लाख ६४ हजार ५७५
* भडगाव--९५ हजार ८२०
* भुसावळ-- दोन लाख ५२ हजार ८०७
* बोदवड-- ४५ हजार ८१३
* चाळीसगाव--दोन लाख ३५ हजार ४३४
* चोपडा--एक लाख ७० हजार ५३१
* धरणगाव--९६ हजार १०३
* एरंडोल- ९४ हजार ५६२
* जळगाव-- पाच लाख ३२ हजार ८६७
* जामनेर--एक लाख ८१ हजार ७६३
* मुक्ताईनगर--८४ हजार १०३
* पाचोरा-- एक लाख ६४ हजार ७४८
* पारोळा--एक लाख ४० हजार २६८
* रावेर-- एक लाख ६४ हजार ३३८
* यावल--एक लाख ४० हजार २६४

हेही वाचा: धुळे : 'तो' मृत्यूदेह विधवा तरूणीचा, प्रेम संबंधातून खून


आकडे बोलतात..लसीकरण असे

जिल्हा एकूण--२५ लाख २८ हजार १३४

* शहरी भाग---दहा लाख ३९ हजार ९८४
* ग्रामीण भाग--१४ लाख ८८ हजार १५०

loading image
go to top