खडसेंचा संघर्ष... अंतिम टप्प्यात की निर्णायक पातळीवर?

eknath khadse
eknath khadse
Updated on

जून २०१६ मध्ये राज्य मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर खडसेंनी सुरवातीला संयमी भूमिका घेत नेतृत्वाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्यावरील आरोप व चौकशीचे सत्र जसे लांबत गेले, तसा त्यांचा संयमही सुटत गेला. त्यातून त्यांनी नेतृत्वाबद्दल अंतर्गत आणि जाहीरपणेही नाराजी व्यक्त केली. खडसेंची ही भूमिका अनेकदा नेतृत्वाच्या पचनी पडली नाही. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्या पक्षनेतृत्वावरील नाराजीचा, संयमाचा बांध फुटेल, अशी स्थिती निर्माण झाली. पण, या स्थितीतही खडसेंना कोणतीही कृती करण्यास भाग पाडले नाही. 
खडसेंवरील आरोप, त्यांचा राजीनामा व पुढे पक्षातून त्यांना डावलण्याची प्रक्रिया यातून हा चार वर्षांतील घटनाक्रम एक मोठे षडयंत्र आहे, असा खडसेंचा समज होणे स्वाभाविक आहे. अर्थात, आता हा केवळ समज राहिलेला नाही तर ते या भूमिकेवर ठाम आहेत, त्यासाठी पुरावे देण्याचीही त्यांची तयारी आहे. त्यांच्या विरोधातील हे षडयंत्र रचून त्याला परिणामांपर्यंत पोचविणे हे अर्थातच कुण्या एकट्या व्यक्तीचे काम नाही, त्यात अनेकांनी योगदान दिले असणारच. त्यामुळे ‘अनेकां’विरुद्ध खडसेंनी आता आक्रमक आणि निर्णायक पवित्रा घेतल्याचे सध्यातरी दिसते. 
नेतृत्वावर टीका करणे ही पक्षाची संस्कृती नाही, हे साडेतीन दशके राजकारणात असलेल्या खडसेंना सांगायची गरज नाही. अशा घटनांवरून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी त्यांना ‘जाहीरपणे बोलू नका, पक्षांतर्गत बैठकीत बोला,’ असा सल्लाही दिला. पण, पक्षाच्या पातळीवरही या बाबी अनेकदा सांगून झाल्याचा दावा खडसे करतात. आतातर ते त्यांच्याविरोधातील षडयंत्रावर थेट पुराव्यांसह पुस्तक काढायचे सांगत आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासूनच्या घटना, घडामोडी अन्‌ पडद्यामागच्या हालचालीही त्यात असतील. स्वाभाविकत: या संभाव्य पुस्तकाच्या कथानकातील कथित ‘व्हीलन’ फडणवीस व मुख्यमंत्री असताना त्यांच्या डाव्या- उजव्या बाजूला उभे असलेले तत्कालीन नेते असतील. 
‘मी स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाही... टायगर अभी जिंदा है...’ ही वक्तव्ये खडसेंचा हा संघर्ष आता संयमापलीकडचा, अस्तित्वाचा आणि निर्णायक असेल, याचे संकेत देणारा आहे. सध्यातरी कोविड संसर्गाच्या एकूणच स्थितीमुळे या संघर्षाला इंधन मिळणे कठीण आहे. पण, कोविडपश्‍चात भाजपमधील याअंतर्गत युद्धासाठी खडसेंना त्यांच्या समर्थनातील किती जण इंधन पुरवतील, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. फडणवीस आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर टीका करताना प्रत्येकवेळी राजकीय ‘स्टेटमेंट’ करुन आता भागणार नाही. पक्षाकडून समाधान झाले नाहीच तर खडसेंना काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल. येणाऱ्या काळात त्यांनी ती घेतली नाही तर त्यांच्या या संघर्षाला तत्कालीन ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’शिवाय दुसरा अर्थ उरणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com