टि्वट करून एकनाथ खडसेंनी ब्राह्मण समाजाची मागितली माफी !

भूषण श्रीखंडे
Monday, 9 November 2020

एकनाथ खडसे यांनी ट्विटवरुन ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागितली आहे. यात ते म्हणाले, की सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला.

जळगाव ः कुऱहा काकोडा येथील कार्यकर्ते प्रवेश कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना ब्राम्हण समाजाबद्दल वक्तव्य केले होते. यावर आज खडसेंनी त्यांच्या टिट्व वरून ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागीतली असून मी कायमच ब्राह्मणांचा आदर केला आहे, असे टिट्वट केले आहे.

शुक्रवारी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱहा काकोडा येथे कार्यकर्ते प्रवेश कार्यक्रम झाला होता. यावेळी एकनाथ खडसेंकडून माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टिका भाषणातून केली होती. यावेळी त्यांच्याकडून ब्राह्मणा विषयी वक्तव्य करण्यात आले होते. या वरून विविध माध्यमातून बातम्या प्रसिथ्द झाल्याने आज एकनाथ खडसेंनी ब्राह्मणसमाजाची माफी टिट्व करून मागितली आहे. 

बोलण्याचा विपर्यास केला गेला

एकनाथ खडसे यांनी ट्विटवरुन ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागितली आहे. यात ते म्हणाले, की सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं खडसेंनी ट्विट त्यांनी केले.

 

काय बोलले होते खडसे ?

खडसें भाषणात बोलतांना मुख्यमंत्री पदावेळी फडणवीस आणि त्यांच्यादरम्यान झालेल्या वादा बद्दल सांगितले. यात ते म्हणाले, की मुख्यमंत्री वेळी मला भाऊ तुम्ही दिलदार आहे, तुम्ही घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायच आहे असे मला सांगितले, तेव्हा मी आजपर्यंत अनेक दान केले तसेच मुख्यमंत्री पद ब्राम्हणाला दान केले असे सांगितेले असे वक्तव्य केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse apologizes to brahmin community