गुरुवारचा मुहूर्त पक्का?; खडसे मुंबईला जाणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

खडसे यांनी याबाबत स्‍पष्‍ट करत कोणताही राजीनामा दिलेला नसून याबाबत दोन दिवसात मुंबईत पत्रकार परिषद घेवून सर्व स्‍पष्‍ट करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यातच उद्या (ता.२१) ते मुंबईला जाणार असल्‍याने तेथे गेल्‍यानंतर खडसे राष्‍ट्रवादीत जाणार किंवा नाही; यावरील पडदा उठणार आहे.

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्‍याची जोरदार चर्चा गेल्‍या काही दिवसांपासून सुरू आहे. खडसे समर्थकांनी नाथाभाऊ भाजपमध्ये नसणार असे सांगत असून दोन दिवस सोशल मीडियावर तसे संदेश देखील फिरले. मधले दोन दिवस तर खडसेंनी भाजपच्या सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिल्‍याची चर्चा रंगली होती. शिवाय, राष्‍ट्रवादी प्रवेशाचा त्‍यांचा गुरूवारचा मुहूर्त देखील ठरविण्यात आला होता. ही चर्चा शांत झाल्‍यानंतर पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्‍या असून खडसे उद्या मुंबईला जाणार असल्‍याचे सांगितले जात आहे.

चर्चा रंगली, पण प्रतीक्षा कायम 
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली होती. परंतु, स्‍वतः खडसे यांनी याबाबत स्‍पष्‍ट करत कोणताही राजीनामा दिलेला नसून याबाबत दोन दिवसात मुंबईत पत्रकार परिषद घेवून सर्व स्‍पष्‍ट करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यातच उद्या (ता.२१) ते मुंबईला जाणार असल्‍याने तेथे गेल्‍यानंतर खडसे राष्‍ट्रवादीत जाणार किंवा नाही; यावरील पडदा उठणार आहे.

गुरूवारचा मुहूर्त पक्‍का
खडसेंच्या निकटवर्तीयांनी दिलेल्‍या माहितीनुसार खडसेंनी राजीनामा दिल्‍याने ते आता राष्‍ट्रवादीत गुरूवारी प्रवेश करणार असल्‍याचे सांगितले. गुरुवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत स्वतः खडसे यांनी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची घोषणा केलेली नाही. परंतु, खडसे उद्या मुंबईत जाणार असल्‍याने गुरूवारी प्रवेश होणार असल्‍याची चर्चा खरी ठरी ठरते की काय; असाच अंदाज बांधला जात आहे.

देशमुखांच्या गुप्तगूमध्ये ठरले?
खडसे राष्‍ट्रवादीत जाणार असल्‍याची चर्चा असताना बोरखेडा येथील हत्‍याकांड प्रकरणी परिवारालाची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आले असता, त्‍यांची भेट खडसे यांनी घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये पाच मिनिट चर्चा झाली होती. या चर्चेत सर्वच ठरले असल्‍याचा अंदाज बांधला जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse will go to mumbai and clear issue rashtrawadi congress entry