एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह, उपचारासाठी मुंबईला जाणार

भूषण श्रीखंडे
Thursday, 19 November 2020

कोरोना रिपोर्ट देखील पाॅझिटिव्ह आल्याने त्यांनी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, की माझा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कातील नागरिकांनी त्याची कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले.

जळगाव ः पाच दिवसापूर्वी एकनाथ खडसेंची मुलगी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे या कोरोनाची बाधीत झाल्या होत्या. त्यामुळे एकनाथ खडसे क्वांरटाईन होते. आज मुक्ताईनगर वरून जळगावी दुपारी आल्यावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. याबाबत माध्यमांना माहिती देतांना खडसे म्हणाले, की माझा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असून उपचारासाठी ते मुंबईला जाणार आहे. माझ्या संपर्कात जे आले त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील यावेळी खडसेंनी केले.

आवश्य वाचा-  शेतकऱ्यांना त्रास दिला तर शिवसेनेशी गाठ- आमदार चिमणराव पाटील -

जिल्हा बँकेच्या अध्यक्षा तथा एखनाथ खडसेंची मुलगी रोहिणी खडसे यांचा पाच दिवसापूर्वी कोरोना बाधित झाल्या होत्या. तशी माहिती त्यांनी टि्टर द्वारे दिली होती. मुलगी कोरोना बाधित झाल्यानंतर खडसे देखील क्वारंटाईन झाले होते. आज दुपारी जळगाव येथे आले असता त्यांचा कोरोना रिपोर्ट देखील पाॅझिटिव्ह आल्याने त्यांनी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, की माझा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कातील नागरिकांनी त्याची कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले.  तसेच उपचारासाठी आज मुंबईला जाणार असल्याचे खडसेंनी सांगितले.

 

शरद पवारांचा दौरा रद्द

दिवाळी झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार होते. परंतू खडसेंंची मुलगी रोहिणी खडसे या पाॅझिटिव्ह आल्यानंतर तसेच खडसे क्वारंटाईन झाले असल्याने शरद पवारांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. दिवाळी नंतर खडसे मोठा कार्यक्रम घेवून त्यांची शक्ती दाखविणार होते. परंतू कोरोनामूळे हा कार्यक्रम त्यांचा लांबविणीवर पडणार आहे. 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse's corona report positive