मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार

भूषण श्रीखंडे
Wednesday, 2 September 2020

केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात ही होत तरी पक्षाला सत्ता गमवावी लागली. तसेच  'राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार

जळगाव : आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढविण्यासाठी आम्ही जीवाचे राण केले. परंतू आता उलटेच झाले असून नविन उदयास आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवताय. माझावर अन्याय झालाय याचा संताप कार्यकर्त्यामध्ये आहे त्याचा कधी स्फोट होईल सांगता येणार नाही 

आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी पून्हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर शाब्दीक तोफ डांगलेली आहे. यावेळी बोलतांना खडसे म्हणाले, राज्यात पक्षाला प्रतिकूल परिस्थिती नव्हती तरी गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी राज्य पिंजून काढत पक्षाची उभारणी केली. मागच्या वेळेस युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळवली होती. केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात ही होत तरी पक्षाला सत्ता गमवावी लागली. तसेच  'राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार आहे अस म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता खडसेंनी फडसवींना टोला लगावला आहे.

तर स्फोट होवू शकतो
गेल्या चाळीस वर्षापासून मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची संताप भाजपचे कार्यकर्तेसह अन्य पक्षातील मला माननारा कार्यकर्त्यांमध्ये आहे. याचा कधी ही स्फोट होऊ शकतो. 

अनेक पक्षांनी मला आॅफर 
माझ्यावर अन्याय झाल्याचे कार्यकर्त्यांची भावना असून कोरोनाचं संकट दूर झाल्यावर मी सर्वांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेईल. तसेच राज्यभर दौरा करेल. अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी आॅफर दिली पण एकनिष्ठ पक्ष सोडण्याचा विचार कधीही मनात आला नाही.  

आघाडी सरकारकडे पडणार नाही
सध्याच्या आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे. आताचा विचार केला असता एक दीड वर्ष या सरकारमध्ये उलथापालथ होईल असं आपल्याला वाटतं नाही. सत्तेत भाजपला यायचे असेल तर नुसते आमदार फोडून चालणार एका पक्षाला सोबत घेवून सत्तेत यावे लागणार आहे. मात्र हे आता आशक्य असल्याचा भाजपला पून्हा खडसेंनी घरचा आहेर दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknathrao Khadse again verbally attacked BJP leaders.