खडसेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष !

भूषण श्रीखंडे
Wednesday, 21 October 2020

भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला.

जळगाव ः एकनाथराव खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते आता प्रवेश करणार आहे. डसेंनी  समर्थक व त्यांचे कार्यकर्त्यांनी एकच जलोष्ष खडसेंच्या घराबाहेर आज केला. फटाके फोडून आनंद व्यक्त करत `नाथाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है` आदी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.

भाजपचे नाराज एकनाथराव खडसे हे गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु असताना अखेर भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला असून आता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. राजीनामा दिल्यानंतर खडसेंच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. 

माझा नेता माझा अभिमान बॅनर
खडसे समर्थकांनी खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर माझा नेता माझा अभिमान असे बँनर झळकविण्यास सुरू केले आहे. तर फेसबुक, व्हाॅटसअपवर देखील खडसेंचे फोटो राष्ट्रवादीच्या बँनवर वर दाखविल्याचे पोस्ट व्हारल होवू लागले. 

फटाके फोडून जल्लोष 
मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवास स्थानी तसेच जळगाव येथील निवास्थाना बाहेर खडसेंच्या समर्थकांनी घोषणा देत जल्लोष केला. तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknathrao Khadse resigned from the BJP, there was a commotion of activists outside his house