खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम !

भूषण श्रीखंडे
Tuesday, 13 October 2020

मी भाजपातून गेलेलो नाही, त्यामुळे मी कसे सांगू. तसेच नंदूरबारचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी मला राष्ट्रवादीत जाण्यासाठी विचारले होते त्यांना मी जाण्याचा सल्ला दिला होता.  

जळगाव : भाजपातील नाराज नेते एकनाथराव खडसे नुकताच मुंबई वारी करून आले असून त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चीत मानला जात आहे. परंतू प्रवेश केव्हा, कुठे, कसा होणार तसेच मी आजून पक्ष सोडलेला नाही असे खडेसें माध्यमांना सांगत असल्याने खडसेंचा पक्षांतारचा सस्पनेंस कायम आहे. तर आज माजी भाजपचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येत असल्याने आजच खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून भाजपात अन्याय होत असून फडणवीसांना राजकीय कारकिर्दी खराब केल्याचे गंभीर आरोप खडसेंनी वेळोवेळी केले आहे. यात फडणवीसांवरील नाराजी तर उघड-उघड दाखविली आहे. त्यात जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेवून शरद पवारांनी यांच्या प्रवेशाची चाचपणी केल्यानंतर खडसे स्वत: तीन-चार दिवसांपासून मुंबईत होते.  तेव्हापासून खडसेंचा प्रवेश राष्ट्रवादीत निश्चित मानले जात असल्याचे बोलले जात आहे. परंतू या विषयावर खडसे माध्यमांशी बोलण्यास टाळत आहे.

पाडवींना राष्ट्रवादी जाण्याचे मीच सांगितले
खडसे भुसावळ येथे सोमवारी एका विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर खडसेंनी त्यांच्या सोबत काही नेते जातील का याबाबत विचारणा केली. यावर खडसेंनी मी भाजपातून गेलेलो नाही, त्यामुळे मी कसे सांगू. तसेच नंदूरबारचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी मला राष्ट्रवादीत जाण्यासाठी विचारले होते त्यांना मी जाण्याचा सल्ला दिला होता.  

महाजनांचे आमंत्रण स्विकारणार का ?
आमदार गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनचे मल्टी स्पेशलिटी हाॅस्पीटलचे उद्घाटनाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहे. या कार्यक्रमाला खडसेंना देखील आमंत्रण महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे या कार्यक्रमास खडसे उपस्थित राहतील का, कारण फडणवीसा सोबत, महाजन यांच्यावरील देखील खडसे नाराज आहे. त्यात राष्ट्रवादीत जाण्याचे खडसेंचे निश्चीत असल्याचे मानले जात असल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहतील का हे देखील पाहण्यास उत्सुक ठरणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknathrao Khadse's entry into the NCP is still a matter of suspense