esakal | प्रसाद लाड यांनी जनतेतून आधी निवडून दाखवावे- एकनाथ खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रसाद लाड यांनी जनतेतून आधी निवडून दाखवावे- एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजप नेते व एकनाथ खडसें यांच्यात शाब्दीक युध्द रंगत आहे.

प्रसाद लाड यांनी जनतेतून आधी निवडून दाखवावे- एकनाथ खडसे

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ए्कनाथराव खडसे व भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात शाब्दीक वाद सुरू झाला आहे. खडसेंनी लाड यांच्यावर शाब्दीक टिका करत मी सहा वेळा जनतेतून निवडून आलो आहे.  लाड यांनी जनतेतून एकदारतरी निवडून यावे असे खुले आव्हान खडसेंनी दिले आहे. 

एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजप नेते व एकनाथ खडसें यांच्यात शाब्दीक युध्द रंगत आहे. आता माजी मंत्री प्रसाद लाड एकनाथराव खडसे यांच्यात वाद सुरू असून लाड यांनी खडसेंवर व्टीटरवर द्वारे आजपर्यंत राजकारणात भाजप संघटन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्य जीवावर निवडून येणारे स्वत:च्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. पक्ष नेतृत्वाला दोष देवून पक्ष त्याग केला, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येवून पद भोगली. त्यांच्या जाण्याने भाजप पक्षाला कोणतेही नुकसान होणार नाही असे शाब्दीक टिका केली

लाड यांनी जनतेतून निवडून दाखवावे

कि मी जनतेतून तब्बल सहा वेळा निवडून आलो आहे, आमदार प्रसाद लाड यांनी किमान एक वेळा तरी जनतेतून निवडून येवून दाखवावे. तसेच मी भाजप मधून गेल्यावर परिणाम होत नाही तर सतत का मी खडसे गेल्यावर भाजपला फरक पडणार नाही असे सतत का म्हणत आहेत.

पक्षातील लोकांनीच केला मुलीचा पराभव

मुलीच्या पराभवाच्या बाबतीत बोलतांना खडसे म्हणाले, ‘मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षातील लोकांनीच पक्षविरोधी काम केले. माझ्या मुलीला पाडण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आतून पाठींबा होता.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image