जळगावचे जिल्हा रुग्णालय टाकतेय ‘कात’

जळगावचे जिल्हा रुग्णालय टाकतेय ‘कात’

जळगाव ः येथील जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात काही महिन्यांपासून अनेक चांगले बदल होताहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करताना अत्याधुनिक प्रकारची यंत्रणा कार्यान्वीत करण्यापासून ते रुग्णालय परिसर सुशोभीकरणापर्यंतची कामे जिल्हा रुग्णालयाने केली आहेत. जिल्हा रुग्णालयात आढळून आलेली ब्रिटीसकालीन निर्जंतूकीकरण मशीन आकर्षण ठरत आहे. 

जिल्हा रुग्णालयात कोविड संसर्गाच्या निमित्ताने आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे. पुणे, मुंबईतील रुग्णालयापेक्षाही अत्याधुनिक यंत्रणा येथे कार्यरत करण्यात आली आहे. नुकतेच २० किलोलिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट तयार करण्याच्या कामास सुरवात झाली आहे. रुग्णांच्या बेडपर्यंत ऑक्सीजन पाईपलाईन करण्यात आली आहे. आयसीयू बेड, व्हेटींलेटरची सुविधाही आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा रुग्ण येवो द्या येथे उपचार होतीलच. 
आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णालयाचा परिसर सुशोभिकरणावर आता भर दिला जात आहे. रुग्णालय परिसरात सर्व रस्ते दुरूस्त करून त्यावर आकर्षक अशा फरशा बसविल्या जात आहे. सर्व इमारताना रंगरंगोटी करून परिसरात वृक्षारोपण केले जात आहे. 

निर्जंतुकीकरण मशीन ‘ॲन्टीक’ पीस 
जिल्हा रुग्णालयात ब्रिटिशकाळात १९३६ मध्ये बॉयलर तयार केले होते. बॉयलरच्या पाण्यावर ऑपरेशनची साहित्य निर्जंतुकीकरण केले जात असे. वैद्यकीय शस्त्रक्रियेत निर्जंतुकीकरणाला मोठे महत्व आहे. सुमारे सात ते आठ दशकांपुर्वी पारंपारिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या साधनांचे निर्जंतुकीकरण (Disinfection) करण्यासाठी हे मशीन वापरले गेले होते. वाफेने सर्जरीसाठी लागणारे साहित्य निर्जंतुक करणारे उपकरण म्हणून या मशीनची ओळख आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात हे उपकरण जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक काळाची साक्ष म्हणून जतन करण्यात येत आहे. 


रुग्णालयातील अतिक्रमण हटविताना ब्रिटीशकालीन निर्जंतुकीकरण मशिन सापडले होते. ते अतिशय गंजले होते. त्याला रंगरंगोटीकरून ऐतिहासीक वारसा म्हणून चौकात ठेवण्यात आले आहे. यामुळे जून्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे. 
डॉ.जयप्रकाश रामानंद 
‘डीन’ जिल्हा कोविड रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com