नोंदणी न झालेल्या दस्तावरील ‘नोंदणी फी’च्या दंडात मिळणार सूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोंदणी न झालेल्या दस्तावरील ‘नोंदणी फी’च्या दंडात मिळणार सूट

नोंदणी न झालेल्या दस्तावरील ‘नोंदणी फी’च्या दंडात मिळणार सूटजळगाव : एप्रिल व मे महिन्यात लॉकडाउन असल्यामुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात सूट देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. डिसेंबरमध्ये शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीमुळे स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे दस्तावर पूर्ण झाले; परंतु लॉकडाउनमुळे एप्रिल-मे या महिन्यांमध्ये नोंदणी न झालेली हस्तांतर व विक्री करारनामा या दस्तावरील नोंदणी फीच्या दस्तांमध्ये प्रथम दोन महिन्यांसाठी, जानेवारी २०२१ मध्ये निष्पादित झालेले परंतु नोंदणी न झालेले दस्त व अशा दस्तांवरील नोंदणी फीचा दंड जो नोंदणी फी रकमेच्या कमीत कमी २.५ पट व जास्तीत जास्त १० पट इतका आहे, तो कमी करून शासनाने एक हजार रुपये इतका निश्‍चित केला आहे. (exemption from penalty for registration fee on unregistered documents)

हेही वाचा: सुविधा द्या..१५ हजार कंटेनर केळी निर्यात करू!

या कालावधीत यापूर्वी दंडाचा भरणा करून दस्त नोंदणी केली असल्यास दंडाचा परतावा मिळणार नाही, असे महसूल व वन विभागाचे सहसचिव श्रीधर डुबे पाटील यांनी काल जारी केलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: जळगावात पुन्हा ‘मिनीलॉकडाऊन’; काय सुरू, काय बंद! वाचा सविस्तर

आज कार्यालय उघडे
आज (ता. २६) फक्त अशाच प्रकारचे दस्त नोंदणीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये उघडी ठेवण्यात येणार आहेत. संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी सांगितले.

Web Title: Marathi News Jalgaon Exemption From Penalty For Registration Fee On Unregistered

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..