
शाकाहारा बाबत बाफना यांनी त्रीसुत्री कार्यक्रम राबवित त्याचा प्रसार व प्रचार त्यांनी केला. शाकाहाराबाबत नऊशे ठिकाणी त्यांनी आतार्पयंत भाषण दिले आहे.
जळगाव ः जळगाव शहरातील प्रसिध्द सुर्वण व्यवसायीक रतनलालजी बाफना यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. ते बाफना ज्वेलर्सचे संचालक होते. तसेच शाकाहाराचे प्रणेत तसेच गो सेवा भक्त म्हणून तसेच जळगाव जिल्हासह देशातील अनेक समाजीक कार्या बाबत त्यांची ओळख होती.
जळगाव शहरातील सुवर्ण व्यवसायीक, शाकाहाराचे प्रणेता तसेच श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावचे कार्याध्यक्ष रतनलाल चुनिलालजी बाफना (वय ८६) यांचे आज दुपारी अडीच वाजता निधन झाला. त्यांच्या पश्चात पत्नी नयनतारा, राजकुमार, सिध्दार्थ बाफना असे दोन पुत्र असून
शाकाहाराचे प्रणेता
शाकाहारा बाबत बाफना यांनी त्रीसुत्री कार्यक्रम राबवित त्याचा प्रसार व प्रचार त्यांनी केला. शाकाहाराबाबत नऊशे ठिकाणी त्यांनी आतार्पयंत भाषण दिले आहे. त्यांनी गोसेवा अनुसन्धान केंद्राची स्थापना करून आतार्पयंत तीस हजार गायीचे संरक्षण त्याच्या शेणापासून व गोमुत्रापासून औषधी व खत तयार करण्याचे कार्य सुरू आहे.
बाफनांचे समाजीक कार्य
गरिब व गरजु विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप, झुणका भाकर केंद्र , अपंगाना मदत, गरीब रुग्णांना मदत तसेच मांगीलालजी बाफना नेत्र चिकित्सा व नेतत्रेढी सुरू करून १६० नेत्रहिनांना डोळे देण्याचे काम केले आहे.
अंतिम संस्कार
बाफना यांच्यावर सायंकाळी साडेपाच वाजता साडेपाच वाजता आर सी बाफना गोशाळा येथे होणार आहे.