शेती रस्त्यांचे ग्रामीण रस्त्यांमध्ये रूपांतर : गुलाबराव पाटील 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

मध्यम व लहान शेतकरी हे विविध पिकांचे फळ भाज्यांचे तसेच कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात मात्र शेतीचे म्हणजे योजना बाह्य रस्त्यांच्या विकासा अभावी शेतमाल बाजार पेठेत येईपर्यंत खराब होतो .

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील १८२ किमी लांबीच्या ४७ योजनाबाह्य (शेती रस्ते) ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता मिळाली आहे. या रस्त्यांचा जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत विकास होणार असून यामुळे हजारो शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

याबाबत माहिती देतांना गुलाबराव पाटील यांनी सांगितले, कि मोठे , मध्यम व लहान शेतकरी हे विविध पिकांचे फळ भाज्यांचे तसेच कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात मात्र शेतीचे म्हणजे योजना बाह्य रस्त्यांच्या विकासा अभावी शेतमाल बाजार पेठेत येईपर्यंत खराब होतो . नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीनुसारगांभीर्याने दखल घेऊन योजनाबाह्य म्हणजे शेतीचे दोन गावांना जोडणारे रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून मंजूर केले त्यामुळे मतदार संघातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 
 
या शेत रस्त्याचा सामावेश 
धरणगाव तालुक्यातील दोनगाव खू. ते ग्रा.मा.17, चांदसर ते ग्रामा 43 , कल्याणे होळ ते रामा 6, बांभोरी बु. ते प्रजिमा 50, धरणगाव ते सार्वे, अहिरे बुद्रुक ते अहिरे खुर्द, तरडे ते पष्टाने खू., बोरगाव ते विवरा, भोणे (लक्ष्मीनारायण मंदिर ) ते बिलखेडा , श्याम खेडा ते धरणगाव, साकरे ते सोनखडी, चोरगाव ते फुपनी, धार ते शेरी, अंजनविहीरे ते खामखेडा ते 50 , जांभोरा ते ग्रामा 46, ग्रामा 17 ते दोनगाव बु. ते जळगाव तालुका हद्द, चमगाव ते उखलवाडी अश्या 63.500 किलोमीटरच्या 17 रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दरजोन्नती मिळाली आहे.

जळगाव तालुक्यातील फुपनगरी ते वडनगरी , भोकर ते कोळंबा , वडनगरी ते हिरवेवाट , देवगाव ते भोकर , जामोद ते बाबुळगाव , पळसोद ते बाबुळगाव, भादली खु ते कठोरा ते किनोद ते फुपनी, रामा 42 ते फुपनगरी ते ममुराबाद, आव्हाने ते खेडी , नांद्रा ते धानोरा , डोणगाव ते महासावद रेल्वेगेट, ममुराबाद ते नांद्रा खु, पिलखेडे ते करंज, जवखेडा ते सामनेर, डोणगाव ते वडली, भादली ते पिंपरी (यावल तालुका हद्द), रा.म.मा.6 (मकरापार्क) ते तरसोद ते भादली बु, भादली भोलाने ते कानसवाडे , भादली (मंडमाई) असोदा, शेळगाव ते भालशिव (यावल तालुका हद्द ), भादली ते शेळगाव खु , कंडारी ते वाघुर नदीपर्यंत , देण्याचे सुनसगाव भादली ते भोलाने , कंडारी ते खादगाव (जामनेर तालुका हद्द ) , शिरसोली प्र.न. ते सज्जनमियाँ धरण , रिधुर ते प्रजिमा 58 , नांद्रा ते रिधुर, भादली ते शेळगाव , सावखेडा ते बिबानगर अश्या 119 किमीच्या 30 रस्त्यांना दरजोन्नती प्राप्त झाली आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघात एकूण 182 किलोमीटर लांबीच्या 47 रस्त्यांना दरजोन्नती मिळाल्यामुळे रस्त्यांचा विकास होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farm road created rural road gulabrao patil