esakal |  दिवाळीच्या दिवशी उचले टोकाचे पाऊल आणि संपूर्ण गाव झाले सुन्न
sakal

बोलून बातमी शोधा

 दिवाळीच्या दिवशी उचले टोकाचे पाऊल आणि संपूर्ण गाव झाले सुन्न

गेल्या चार पाच वर्षापासून शेत पिकत नसल्यामुळे उभा झालेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा याची चिंता त्याला कायम सतवायची.

 दिवाळीच्या दिवशी उचले टोकाचे पाऊल आणि संपूर्ण गाव झाले सुन्न

sakal_logo
By
गजानन खिरडकर

मुक्ताईनगर ः सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातील धामणगाव येथील तरूण शेतकऱ्याने दिवाळी दिवशीच विषारी द्रव्य सेवन करून आपली जिवनयात्रा संपवली. या घटनेमुळे गाव व परिसरात खळबळ उडाली असून गांव सुन्न तर परिसरात शोककळा पसरली आहे.

धामणगाव ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी पुत्र शेती करीत असलेला शेख फारूख शेख हुसैन वय 27 या तरुण शेतकऱ्याने 14 रोजी दिवाळी च्या दिवशी दुपारी राहत्या घरात विषारी द्रव्य सेवन करून आपली जिवनयात्रा संपवली शेख फारुख हा तरूण शेतकरी पुत्र होता. आईच्या नावावर बुलढाणा जिल्ह्यातील इस्लामपुर येथे दोन एकर शेती होती तोच कर्ता असल्याने शेतीचे संपूर्ण व्यवहार तोच बघायचा मात्र गेल्या चार पाच वर्षापासून शेत पिकत नसल्यामुळे उभा झालेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा याची चिंता त्याला कायम सतवायची.

पेरलेले पिक गेले  

यावर्षी त्याने आपल्या शेतात सोयाबीन चे पिक पेरलेले होते मात्र नापिकी झाल्या मुळे त्याने दिवाळी च्या दिवशीच आपले जिवन संपविले त्यांच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी एक मुलगा तीन भाऊ असा परिवार आहे.

संपूर्ण गावार शोककळा

दिवाळीच्या दिवशीच दुदैवी घटनेची माहिती समजताच संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली असून गाव सुन्न झाले आहे. पोलीस स्टेशनमध्ये अकस्मातमृत्युची नोंद झाली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे