२६/११ हल्यातील हिंगोण्याचे शहीद जवानाचा राजकीय पदधिकारींना पडला विसर

शब्बीर खान
Friday, 27 November 2020

राजकीय पद अधिकाऱ्याने हिंगोणा येथे शहीद स्मारकावर. का. भेट दिली नाही तसेच त्यांच्या अशा देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाला वेळ नाही होती कां ?

हिंगोणा ः  २६/११ च्या मुंबई येथील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान स्व. मुरलीधर लक्ष्मण चौधरी  हे ता. यावल मधील हिंगोणा गावचे रहीवासी होते. मुंबई येथे कार्यरत असतांना २६/११ च्या दहशतवादी हल्यात प्रथम गोळी लागून वीर मरण आले होते. परंतू जिल्ह्यातील एक ही नेता शहीद जवानाला श्रध्दांजली वाहण्यासाठी आले नाही. 

जळगाव जिल्ह्यात हींगोणा गावातील जवान स्व. मुरलीधर चौधरी २६/११ च्या मुंबई हल्यात शहीद झाले होते. देशासाठी आपले बलीदान देणाऱ्या जवानांना अनेक ठिकाणी श्रध्दांजली वाहिली जात असते. परंतू स्व. चौधरी यांच्या मुळ गावी  एकही राजकीय पदाधिकारी कींवा लोकप्रतिनिधीनी त्यांच्या मुळ गाव हिंगोणा येथे शहीद स्मारकावर भेट देऊन श्रध्दांजली अर्पण केली नाही.  

अधिकारी, पदाधिकारी यांना वेळ

राजकीय पद अधिकाऱ्याने हिंगोणा येथे शहीद स्मारकावर. का. भेट दिली नाही तसेच त्यांच्या अशा देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाला वेळ नाही होती कां ? अशी उलट सुलट चर्चा हिंगोणा गावात रंगली होती. 

 

ग्रामस्थांमध्ये नाराजी

स्व. मुरलीधर चौधरी. यांच्या हिंगोणा या गावात त्यांच्या हुतात्मा स्मारकावर. देशासाठी दहशदवाद्यांशी लढतांना विरमरण पावलेल्या शहीद स्मारकास श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Forget the office bearers and officers to pay homage to the martyred soldiers