भाजप नगरसेवकांनी माजी मंत्री महाजनांसमोर वाचला समस्येंचा पाढा 

भाजप नगरसेवकांनी माजी मंत्री महाजनांसमोर वाचला समस्येंचा पाढा 
Updated on

जळगाव ः जळगाव शहरात गेल्या तीन वर्षापासून अमृतचे काम संथगतीने सुरु आहे, तसेच इतर विकास कामांना देखील कोणत्याना कोणत्या प्रकारे खोडा घातला जात आहे. त्यामुळे प्रभागातील कामे थांबल्याने नागरिकांची ओरड होत आहे. भाजपच्या नगरसेवकांना बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचा भाजपचे गटनेते भगत बालाणी यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी समस्यांचा पाढा आज आमदार गिरीश महाजन यांच्यापुढे वाचून दाखविला. 

जळगाव शहर महापालिकेच्या कामांचा आढावा आज माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी घेतला. यावेळी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, मनपा स्थायी समिती सभापती अड.शुचिता हाडा, सभागृह नेते ललित कोल्हे, गटनेते भगत बालानी, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामासह शहरातील अनेक समस्यांबाबत महाजन यांच्यासमोर पाढा वाचला. तर सत्ताधारी भाजपला बदनाम करण्यासाठी असा प्रकार केला जात असल्याचा आरोप गटनेते बालाणी यांनी यावेळी केला. 


नगरसेवकांनी धरले मक्तेदाला धारेवर 
अमृत योजने अंतर्गत जलवाहिनीच्या कामाला मुद्दाम मक्तेदार उशीर करत आहे. याबाबत भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीत मक्तेदाराच्या कामांवर नाराजी व्यक्त करत धारेवर धरले. यबाबत महाजन यांनी मक्तेदारासोबत स्वतंत्र बैठक घेवू व मक्तेदाराला मार्च २०२१ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा सूचना यावेळी महाजन यांनी दिली. 

चाचण्या व बेडची संख्या वाढवा- महाजन 
जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दररोजची रुग्ण वाढीची संख्या १५० च्या घरात असल्याची माहिती आयुक्तांनी कोविड बाबत माहिती देतांना सांगितले. याबाबत महाजन यांनी रुग्णांचे हाल होवू नये यासाठी बेड ची संख्या वाढवून अजून एक कोविड सेंटर सुरू करण्याचा सूचना गिरीश महाजन यांनी दिल्या. तसेच कोरोनाच्या चाचण्या अजून वाढवा तसेच मनपाच्या वैद्यकीय विभागात स्टॉप कमी असल्याने भरती प्रक्रिया राबविण्याच्या सुचना महाजन यांनी दिल्या. 


नगरचनातील अधिकाऱयांनी कामाची पद्धत सुधरवावी 
नगररचना विभागात अनेक फाईली काही महिन्यांपासून प्रलंबित असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे नगरचनातील अधिकाऱयांनी कामाची पद्धत सुधरवावी अशा सुचना दिल्या. तसेच प्रलंबीत ४२ कोटींच्या कामांच्या बाबत महापालिका अधिकाऱयांकडून कामाची स्थिती जाणून घेतली. यावेळी शासनाने या प्रकरणी अगोदर काढण्यात आलेली निविदा रद्द केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावर महाजन यांनी पुन्हा फेर निविदा काढण्याच्या सूचना दिल्या आपण याबाबत राज्यशासन व मंत्रालयात पाठपुरावा करू असे आश्‍वासन दिले. तसेच खानदेश मिल मधील रस्ता नागरिकांसाठी खुला करावा अशी सुचना देखील अधिकाऱयांना दिल्या. 


सफाईचे रिक्त जागा भरा 
महापालिकेतील सफाई कामगारांच्या ५२३ जागा भरा याबाबत निवेदन अखिल भारतीय सफाई मजदूरर्फे अजय घेंगट यांनी आमदार महाजन यांना निवेदन दिले. यावेळी रिक्त जागांबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच रिक्त जागा भरण्यात येतील अशी माहिती महाजन यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com