
जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावरून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते.
जळगाव ः माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेती व शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ सर्वश्रृत असून त्यांनी १९८० मध्ये जळगाव ते नागपुर अशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पायी दिंडी काढली होती. या दिंडीला आज ३९ वर्ष पूर्ण होत असून शेतकऱया विषयी त्यांच आज ही तळमळ दिसून येत असून दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांनी पांठिबा दर्शवून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शिष्टमंडळासह भेटणार आहे.
आवश्य वाचा- राज्यात २१३ लाख टन उसाचे गाळप; खानदेशात प्रारंभ -
सात डिसेंबर १९८० रोजी शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जळगाव ते नागपुर अशा शेतकरी पायी दिंडीचे आयोजन केले होते. जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावरून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते. या शरद पवारांनी काढलेल्या या दिंडीमूळे त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती.
विरोधकांना आणले एकत्र
शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शरद पवारांनी या आंदोलनात विरोधकांना एकत्र आणले होते. यात दिग्गज नेत ग. प्र. प्रधान, बाब आढाव, शिवाजीराव देशमुख, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, एस. एम. जोशी, राजारामबापू पाटील, प्रतिमा दंडवते, नानासाहेब गोरे, बापूसाहेब काळदाते, जॅार्ज फर्नांडीस, मृणाल गोरे, गोविंदराव आदिक, ए. बी. वर्धन, अरुण मेहता, शिवाजीराव गिरधर पाटील, सुरेश कलवाडी हे नेते सहभागी झाले होते.
पवनेपाचशे किलोमीटर पायी प्रवास
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जळगाव शहरातून निघालेली पायी दिंडी नागपुरला पवनेपाचशे किलोमीटरचे पायी प्रवास करून पोहचली. त्यावेळीचे अंतुले सरकारने दिंडीत सहभागी होण्यासाठी गेलेले यशवंतराव चव्हाण यांना अटक केली होती. या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. त्यानंतर या आंदोलनाची प्रेरणा घेत दिल्ली येथे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते.
वाचा- मध्य रेल्वेची तिकीट दलालांविरोधात मोठी कारवाई; १७४ गुन्हे दाखल
सिनेकलकरांचा देखील मिळाला होता पाठिंबा
शरद पवारांनी केलेल्या आंदोलनास त्यावेळच्या सिनेकलाकारांनी देखील शेतकरी आंदोलन पाठिंबा दिला होता. यात दिलीपकुमार, जब्बार पटेल, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू ही मंडळी दिंडीत सहभाग घेण्यास नागपुरला निघाले असता शरद पवारांनी त्यांना न येण्याचा निरोप दिला होता.
शरद पवार राष्ट्रपतींनी भेटणार
सद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्ली येथे पंजाब व हरियाणाच्या शेतकऱयांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शरद पवारांनी पांठिबा दिला असून ते शिष्टमंडळासह ९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहे.