जळगावात बर्निंग कारचा थरार, चौघे मित्र थोडक्यात बचावले

भूषण श्रीखंडे
Wednesday, 18 November 2020

अंजिठा चौफुली येथील काम आटपून दुपारी दुपारी अडीच्या सुमारास घरी निघाले असता ते आकाशवाणी चौकात सिग्लनवर थांबले आणि त्यानंतर सुरू झाला बर्निंग कारचा थरार.

जळगाव ः जळगाव शहरातील महामार्गावरील आकाशवाणी चौकात सिग्नलवर उभी असलेली कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले या घटनेत कार संपूर्ण पणे जळाली.तर झालेल्या घटनेत कार मधील चार मित्र थोडक्यात बाचावले.

जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील आकाशवाणी चौकात दुपारी अडीच वाजता बर्निंग कारचा थरार नागरिकांना पाहण्यास मिळाला. कासोदा येथील आशिष मिलींद तायडे (वय २२) हा त्याचे मित्र दिपक अकडमोल, पवन अडकमोल, गोपाल राक्षे हे जळगावला कामानिमित्त कार क्रमांक जी.जे. (०५ सी.एच. ९४४९) ने आले होते. अंजिठा चौफुली येथील काम आटपून दुपारी दुपारी अडीच्या सुमारास घरी निघाले असता ते आकाशवाणी चौकात सिग्लनवर थांबले आणि त्यानंतर सुरू झाला बर्निंग कारचा थरार.

सिग्नलवर थांबले आणि धुर निघू लागला
आकाशवाणी चौकात रेड सिग्नल आशीष तायडे यांनी आपली गाडी थांबवली. आणि गाडीतून धुर लागल्याचे मित्रांना लक्षात येताच चारही मित्रांनी गाडीबाहेर येत धुर निघत असल्याठिकाणी पाहणी केली. शॅाटसर्किटमूळे लागलेली आग क्षणात वाढली आणी संपूर्ण गाडी पेटू लागल्याने चारही मित्र गाडीसोडून पळाल्याने त्यांचा थोडक्यात जीव वाचला. 

अग्निशमन बंब काही मिनीटात
आकाशवाणी चौकात ड्यूटीवर असलेले वाहतुक पोलिसांना हा प्रकार दिसतात त्यांनी महापालिकेच्या आग्निशमन विभागाला तत्काळ फोन करून माहिती दिली. काही मिनीटातच अग्निशमनचे बंब घटनास्थळी हजर होत कारला लागलेली आग विझवली. ही घटना पाहण्यासाठी रस्त्याच्या दोघी बाजूला मोठी गर्दी झालेली होती. तर महामार्गामधेच कार पेटली असल्याने दोन्ही बाजूची वाहतुक थांबल्याने महामार्गावर लांब रांगा लागल्या होत्या. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon four friends survived the tremor of a burning car