अरे व्वा ! जळगाव परिसरात आहे फुलपाखरांच्या ५५ विविध प्रजाती

सचिन जोशी
Wednesday, 16 September 2020

चार वर्षांत शहरात फुलपाखरांच्या ज्या ५५ प्रजातींची नोंद करण्यात आली, त्यांची संख्या त्यांच्या कुळानुसार करण्यात आली आहे. 

जळगाव : सप्टेंबर हा फुलपाखरांचा महिना म्हणून साजरा करण्यात येतो. शहरासह परिसरात गेल्या चार वर्षांत केलेल्या निरीक्षण नोंदीनुसार या भागात फुलपाखरांच्या ५५ प्रजाती आढळून आल्या आहेत. 

फुलपाखरांचे आकर्षण सर्वांनाच असते. हिरवळीवर रम्य वातावरणात आढळून येणारे रंगबिरंगी फुलपाखरू लक्ष वेधून घेतात. त्या पार्श्‍वभूमीवर २०१६ पासून या चार वर्षांत हे निरीक्षण व नोंदी करण्यात आल्या. 

या ठिकाणी आढळले फुलपाखरू 
फुलपाखरांचे निरीक्षण प्रामुख्याने ममुराबाद रोड, कानळदा रोड, निमखेडी रोड, मेहरुण, मन्यारखेडा, सावखेडा रोड, हनुमान खोरे, लांडोरखोरी आदी ठिकाणी रस्त्यालगत व रिकाम्या प्लॉटमध्ये वाढलेल्या झुडपांमध्ये करण्यात आले. तेथे फुलपाखरू आढळून आले. २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या कालावधीत जे फुलपाखरांचे निरीक्षण करण्यात आले, त्यांची नोंद फुलपाखरांच्या छायाचित्रांसह ‘आय फाउंड बटरफ्लाय’(https://www.ifoundbutterflies.org/big-butterfly-month) या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. 

पाच विभागांत विभागणी 
फुलपाखरांची विभागणी ही हेस्परिडी, पॅपलिऑनिडी, पायरिडी, लायसेनिडी आणि निम्फालिडी या पाच कुळांत करण्यात आली आहे. त्यानुसार या चार वर्षांत शहरात फुलपाखरांच्या ज्या ५५ प्रजातींची नोंद करण्यात आली, त्यांची संख्या त्यांच्या कुळानुसार करण्यात आली आहे. 

‘बिग बटरफ्लाय काउंट’ 
भारतात यंदा प्रथमच १४ ते २० सप्टेंबरदरम्यान ‘बिग बटरफ्लाय काउंट’ आयोजित केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात, परसबागेत केलेल्या आपल्या नोंदी फुलपाखरांच्या प्रजाती, संख्या, ठिकाण व स्वतः काढलेल्या फुलपाखरांच्या छायाचित्रांसह ‘आय फाउंड बटरफ्लाय’- (https://www.ifoundbutterflies.org/big-butterfly-month) या संकेतस्थळांवर नोंदवाव्यात. 
- शिल्पा व राजेंद्र गाडगीळ (पक्षीमित्र) 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon four years, Fifty-fivespecies of butterflies were found in Jalgaon area