esakal | ब्रेकिंगःकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यावर जमा होणार निधी
sakal

बोलून बातमी शोधा

Help

ब्रेकिंगःकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यावर जमा होणार निधी

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात कोरोनामुळे (corona) दोन्ही पालक (आई-वडील) गमविलेल्या बालकांची संख्या २० आहे. या बालकांची बँक खाती आयडीबीआय बँकेत महिला व बाल कल्याण विभागाने (Department of Women and Child Welfare) जॉईनरित्या उघडली आहेत. या बालकांसाठी एकूण २ कोटींचा निधी (Funding) मंजूर झाला आहे. लवकरच पुणे आयुक्तालयाकडून (Commissionerate) हा निधी जळगावला बँकेत वर्ग होईल. काही दिवसात २० बालकांच्या बँक खात्यावर प्रत्येकी पाच लाखांचा निधी असेल. तो फिक्स डिपांझीट असेल. बालके सज्ञान झाल्यावर त्यांना तो निधी काढता येईल. अशी माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी ‘सकाळ’ला दिली. ‘सकाळ’ने अनाथ बालकांना (Orphan) मदत मिळावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे.

हेही वाचा: जळगाव :कन्नड घाटात आठ ठिकाणी दरड दुर्घटना;ट्रक दरीत पडून एक ठार

गेल्या चार ऑगस्टला ‘अनाथ बालकांना मदतीचा केवळ फार्स, बालके आर्थिक लाभांपासून वंचीत ः दोन महिने उलटले’ अशा आशयाचे वृत्त चार ऑगस्टला दिले होते. त्यानंतर वारंवार पाठपुरावा ‘सकाळ’ करीत होता. मे- जून महिन्यात केंद्र व राज्य शासनानेही कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदत देण्याचा, त्याचे समुपदेश करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या बालकांचे जीवनमान चांगले राहील.


आदेश होऊन दोन महिने झाले, तरी अद्याप जिल्हा महिला व बालकल्याण विभागातर्फे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सुरूच होता. आतापर्यंत जे आढळले, त्यांची कागदपत्रे यंत्रणेने जमा केली होती. त्यानंतर शासनाकडे मदत बाबत पाठपुरावा सुरू होता. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजारांवर जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी वीस बालकांनी दोन्ही पालक कोरोनात गमाविले आहेत. त्यांना सर्वोतोपरी मदत महिला व बाल कल्याण विभागातर्फे देण्यात येत आहे.


हेही वाचा: परिवहन मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-चित्रा वाघ

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांचे आपल्या पातळीवरील काम पूर्ण झाले आहे. लवकरच २० अनाथ बालकांच्या खात्यात पाच लाखांचा निधी जमा होणार आहे. तो फिक्त डिपॉझीट म्हणून असेल. त्याशिवाय इतर मदत आम्ही सामाजीक संघटनांकडून संबंधित बालकांना दिली आहे.
-विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी

अशी आहे आकडेवारी..
दोन्ही पालक गमावलेले बालक : २०
एक पालक गमावलेले : ५२०
बालसंगोपन योजनेचे आदेश दिलेले बालक : २१५
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला : २८५

loading image
go to top