दरवाजा उघडा ठेवणे तरूणींना पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

शहरातील गणेश कॉलनी परिसरातील गणगोपी अपार्टमेंटमध्ये सदर तरूणी वास्‍तव्यास आहेत. भाड्याने रूम घेवून चौघीजणी एकत्र एकाच रूममध्ये राहतात.

जळगाव : परराज्‍यातील तरूणी कामानिमित्‍ताने जळगावातील गणेश कॉलनी परिसरात वास्‍तव्यास आहेत. त्‍यांना‍या रूमचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे तरुणींना महागात पडले आहे. रूमचा दरवाजा उघडा असल्‍याची संधी साधत तरूणांनी त्‍याचा फायदा घेत तरुणींनी आपल्या उस्‍तीखाली ठेवलेले मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली.
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील गणगोपी अपार्टमेंटमध्ये सदर तरूणी वास्‍तव्यास आहेत. भाड्याने रूम घेवून चौघीजणी एकत्र एकाच रूममध्ये राहतात. आसाम राज्यातील सायरीन क्लो (वय 27), अर्चू खॅानाजाईन (वय 20), तेन्झीन शिआंमी (वय 30) आणि रोझ खाऊकिंप या चार तरुणी शहरातील गणेश कॉलनीत गणगोपी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्या सी शॉ फॅमिली स्पॉ नावाने रिंगरोड परिसरात असलेल्या दुकानावर कामाला आहेत. 

सकाळीच केला दरवाजा उघडा
बुधवारी रात्री चौघेही घरात झोपल्या. काही कामानिमित्ताने सकाळी सातला दरवाजा उघडा केला आणि पुन्हा झोपी गेल्या. यावेळी चौघांनी आपआपल्या उशाला घेतलेल्‍या उस्‍तीखाली मोबाईल ठेवले होते. झोपेत असतांना, दरवाजा उघडा असल्यांची संधी साधत चोरट्यांनी चौघांचे उशाशी ठेवलेले मोबाईल लांबविले. चौघेही उठल्यावर त्यांना आपले मोबाईल दिसून आले. इतरत्र शोध घेतल्यावरही मिळून न आल्याने सायरीनसह अर्चू, तेन्झीम या तिघांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon girl open dour in room and mobile robbery