esakal | सोने पून्हा महागले; एका दिवसात सहाशे रुपयांनी वाढले भाव 
sakal

बोलून बातमी शोधा

सोने पून्हा महागले; एका दिवसात सहाशे रुपयांनी वाढले भाव 

सोन्याच्या भावात तब्बल 10 हजारांनी घसरून स्थिरावले होते. मात्र आता पून्हा ग्राहकांचा कल सोने खरेदीसाठी गर्दी वाढल्याने मंगळवारी सोन्याच्या दर पुन्हा वाढू लागले आहेत.

सोने पून्हा महागले; एका दिवसात सहाशे रुपयांनी वाढले भाव 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव  ः गेल्या महिन्यात सोने व चांदिच्या भावात प्रचंड चढ उतार सुवर्ण बाजारात पाहण्यास मिळाला होता. काही दिवसातच अनलॉक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या सोन्याच्या भावात घसरण झाली सोने ५६ हजारावरून ५१ हजारावर सोन्याचा भाव स्थिरावला होता. मात्र आता सुवर्ण बाजारात ग्राहकांची सोनं खरेदी करण्यासाठी कल वाढल्याने पुन्हा सोन्याच्या दर वाढले आहे. त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीत देखील मंगळवारी सोन्यात सहाशे रुपयांनी वाढ झाली पाहण्यास मिळाली.

लॉकडाऊनमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. कोरोना महासाथीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली. परिणामी लॉकडाऊन काळात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र अनेक देशांमध्ये लॉकडाऊन हळूहळू शिथील करण्यात आला. आणि आॅगस्ट शेवटच्या हप्तात महिन्यात सोन्याच्या भावात तब्बल 10 हजारांनी घसरून स्थिरावले होते. मात्र आता पून्हा ग्राहकांचा कल सोने खरेदीसाठी गर्दी वाढल्याने मंगळवारी सोन्याच्या दर पुन्हा वाढू लागले आहेत.


दिल्लीत सोन्याचे भाव वाढले 
आंतराष्ट्रीय सुवर्ण बाजारात मंगळवारी पून्हा उसळी घेतल्याने दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 422 रुपयांनी वाढ झाली. यामुळे सोन्याचे दर 53,019 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. दरम्यान चांदीचे भाव 1,013 रुपये प्रति किलोने वाढले आहेत.


सोन्याचांदीचे भाव वाढण्याचे कारण

जळगाव सुवर्ण बाजारातील व्यवसायीक सुशील बाफना म्हणाले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच अमिरेकीतल निवडणूकांचा देखील मोठा परिणाम होणार आहे. त्यात कोरोनामुळे गेल्या सहा महिन्याचा मंदिचा काळ दुरू होणार आहे. सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने रब्बीचे पिके चांगले येवून सुवर्ण बाजारात देखील याचा परिणाम पडणार आहे. तसेच दसरा, दिवाळी सण देखील तोंडावर असून ग्राहकांचा कल सोने खरेदीवर जास्त असणार आहे.  

loading image
go to top