शासनाने दूध, दुग्धपावडरला त्वरित अनुदान द्यावे !

कैलास शिंदे
Tuesday, 21 July 2020

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. तीन महिन्यांपासून दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री ठप्प झाली आहे.

जळगाव  : कोरोना महामारीमुळे दुग्धव्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे शासनाने दूध व दुग्धपावडरला अनुदान द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. तीन महिन्यांपासून दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही. दुसरीकडे चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या या शेतकऱ्यांच्या दुधाला शासनान प्रतिलिटर दहा रुपये, तर दूध पावडरला प्रतिलिटर ५० रुपयेप्रमाणे अनुदान द्यावे, या मागणीसाठी भाजपने सोमवारी (ता.२०) राज्यात आंदोलन केले. जळगावातही सोमवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. आमदार सुरेश भोळे, जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गोकुळ भंगाळे, गिरीश वराडे, संजय भोळे आदी उपस्थित होते.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon government should immediately subsidize milk and milk powder bjp demand