राम राम तात्‍या..लक्ष असू द्या बरं; गावात ऐकू येणार बोल, ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला

देविदास वाणी
Friday, 11 December 2020

१८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

जळगाव : जिल्ह्यातील सुमारे ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा बिगूल वाजला आहे. निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या १५ जानेवारी २०२१ ला मतदान घेण्याचे आदेश आज दिले आहेत. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. २३ डिसेंबरपासून निवडणूकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबरला प्रसिध्द केल्या जाणार आहेत. 
 
जळगाव तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती 
जळगाव तालुक्यात महत्त्वपूर्ण व लोकसंख्या दहा हजारांवर असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदा होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात तरुणांत जोश आहे. जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्रबो, शिरसोली प्र.न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रुक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रुक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदी. 
 
असा आहे निवडणूक कार्यक्रम 
अर्ज दाखल करणे-- २३ ते ३० डिसेंबर 
छाननी-- ३१ डिसेंबर 
अर्ज माघारी, चिन्ह वाटप-- ४ जानेवारी २०२१ 
मतदान-- १५ जानेवारी 
मतमोजणी--१८ जानेवारी 

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी 
तालुका--ग्रामपंचायती 
जळगाव--४३ 
जामनेर--७३ 
धरणगाव--४७ 
एरंडोल--३७ 
पारोळा--५८ 
भुसावळ--२६ 
मुक्ताईनगर--५१ 
बोदवड--२९ 
यावल--४७ 
रावेर--४८ 
अमळनेर--६७ 
चोपडा--५२ 
पाचोरा--९६ 
भडगाव--३३ 
चाळीसगाव--७६ 
एकूण--७८३ 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gram panchayat election program announced