ग्रामपंचायतीचा कोरोना मुक्तीसाठी लढा...कोरोना योध्यांना देणार पुरस्कार ! 

ग्रामपंचायतीचा कोरोना मुक्तीसाठी लढा...कोरोना योध्यांना देणार पुरस्कार ! 
Updated on

भुसावळ  : साकेगाव (ता. भुसावळ) येथे कोरोना योद्धांची बैठक घेण्यात आली. यावेळी गावात आर्सेनिक अल्बम ३० मोफत वाटपाचा निर्णय तसेच आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना उत्कृष्ट कर्मचारी पाच हजार रुपयांचा पुरस्कार घोषित करण्यात आला. 

साकेगाव (ता. भुसावळ) पूर्णपणे कोरोनमुक्त असून, सदैव पूर्णपणे गाव कोरोना मुक्त राहावं यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना नियंत्रण समितीची संयुक्त बैठक पार पडली. या प्रसंगी सरपंच अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. तर माजी सरपंच आनंद ठाकरे, तलाठी श्री. महाजन, ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे, पोलिसपाटील राजू सपकाळे, डॉ. दीपक पाटील, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींची उपस्थिती होती. आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पाच हजार रुपये पुरस्कार व ट्रॉफी प्रदान करण्यात येईल. 

स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न 
साकेगाव ग्रामपंचायत नुकतेच स्मार्ट व्हिलेज म्हणून तालुकास्तरावर सन्मानित झाली असून, नुकताच ग्रामपंचायतीला दहा लक्ष पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हास्तरीय प्रथम बक्षीस पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कंबर कसली असून, ग्रामपंचायत व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून, ग्रामपंचायत जिल्हास्तरीय स्मार्ट व्हिलेज म्हणून, सन्मानित होईल व २५ लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त करेल अशा पद्धतीचे नियोजन ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com