esakal | शेळगाव बॅरेजचे काम लवकरच पूर्ण करणार.- मंत्री  गुलाबराव पाटील  
sakal

बोलून बातमी शोधा

शेळगाव बॅरेजचे काम लवकरच पूर्ण करणार.- मंत्री  गुलाबराव पाटील  

शिवसेनेच्या झेंड्यावर प्रेम करणाऱ्या, बाळासाहेब ठाकरेंप्रती निस्सीम भक्ती व प्रेम करणाऱ्या तळागळातील आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या सच्चा कार्यकर्त्यांना पुढे आणणार.

शेळगाव बॅरेजचे काम लवकरच पूर्ण करणार.- मंत्री  गुलाबराव पाटील  

sakal_logo
By
राजू कवडीवाले

यावल : शेळगाव बॅरेजसाठी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे प्रयत्न आहेत. आगामी काळात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याच प्रकल्‍पावरील पुलाचे टेंडर निघाले असून यावलसह रावेर मधील नागरिकांना जळगाव जाणे खूपच अंतर कमी पडणार आहे. याच रस्त्यावर असोदा रेल्वे गेट साठी उड्डाणपुलाची निविदा मंजूर झाली असून आगामी एक दोन महिन्यात याची अंतिम प्रक्रिया पूर्ण होऊन कामास आगामी वर्षात सुरुवात होईल असे आश्वासन जिल्ह्यचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे आज शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. 

आवश्य वाचा- अरे बापरे अचानक एवढा कापूस आला कुठून;  कुर्‍हे कापूस केंद्रावर रातोरात वाहनांच्या रांगा !
 

यावल येथे बाजार समितीच्या सभागृहात जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली शिवसेना व युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर नामदार गुलाबराव पाटील यांचे सह माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन,बाजार समितीचे माजी सभापती भानुदास चोपडे उपस्थित होते.

सच्चा कार्यकर्त्यांना पुढेआणणार 

प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की जमिनीवर राहून शिवसेनेच्या झेंड्यावर प्रेम करणाऱ्या, बाळासाहेब ठाकरेंप्रती निस्सीम भक्ती व प्रेम करणाऱ्या तळागळातील आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या सच्चा कार्यकर्त्यांना पुढे आणणार आहे. त्यांच्या पदाकडे न बघता निष्ठेकडे बघून जबाबदारी दिली जाईल. शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तालुका पातळी पासून प्रत्येक जिल्हा परिषद गटात पर्यंत जाणार असून गावागावात शिवसेनेच्या शाखा निर्माण करणार असल्याचे नामदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच तालुक्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले. 

वाचा- कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा दिलासा; मृत्यूसत्र सुरुच -
 

महाआघाडी सरकार विकासाचे चौके आणि छक्के मारणार

राजकारणात केव्हा काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असताना सत्तेत भाजपा दूर जाऊन शिवसेना, काँग्रेस, व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महा आघाडी सरकार स्थापन होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती. महाआघाडी सरकार स्थापन वेळी अनेकांनी तीन चाकी सरकार अशी खिल्ली उडवली. मात्र तीन चाकी रिक्षात सर्वसामान्य माणूस बसतो, म्हणूनच हे सरकार सर्वसामान्य माणसांचे आहे. जेमतेम महिना-दीड महिना काम केलेल्या सरकारपुढे कोरोंना मुळे अडचणींचा डोंगर उभा राहिला. त्यामुळे कोविंड शिवाय अन्य कामे होऊ शकले नाहीत. आता कोरोना संपुष्टात येऊ पहात आहे. यापुढे आता महाआघाडी सरकार विकासाचे चौके आणि छक्के मारणार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेने विकास कामांची प्रतीक्षा करावी असे नामदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image