
केळी विम्या बाबत राजकारण करू नये. राज्य शासनाने चार वेळा केळी पीक विमा नियमात बदल करण्यासाठी पाठपुरावा केला. केळी पट्ट्यातील आमदार शिरीष चौधरीही सोबत होते.
जळगाव ः ग्रामीण भागात तमाशात सोंगाड्या चांगला असला तर चांगल्या चांगल्यांना नाचवितो. मी शिवसेनेचा सोंगाड्या आहे. भाजपच्या खासदाराला (उन्मेश पाटील) नाच्या सारखे मी नाचविणार. त्यांनी माझ्या समोर येऊन टिका करावी. असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे लगावला.
आवश्य वाचा- रेल्वेचे लाकडी स्थानक जेथून निघाली रेल्वे युगाची पहाट
खासदार उन्मेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ‘शिंगाडा मोर्चा काढणारा सोंगाड्या झाला’ असे विधान केले होते. त्यावर पालकमंत्री यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
भाजपतर्फे आगामी काळात केळी पीक विम्याच्या रक्कमेबाबत आंदोलन केले जाणार आहे. त्याबाबत विचारले असता पालकमंत्री म्हणाले, की आंदोलन करणे त्यांचे काम आहे. एक तारखेपासून कापूस, मका खरेदीसाठी केंद्र सुरू होताहेत. ते आमच्यामुळे सुरू झाले अशी तयांना ‘टिमकी’ वाजवायची असेल. म्हणून आंदोलनाचा घाट आहे. मात्र केळी विम्या बाबत राजकारण करू नये. राज्य शासनाने चार वेळा केळी पीक विमा नियमात बदल करण्यासाठी पाठपुरावा केला. केळी पट्ट्यातील आमदार शिरीष चौधरीही सोबत होते.
खासदाराने (पाटील) हिम्मत असले तर, त्यांची चालत असेल तर त्यांनी पंतप्रधानाकडून केळी पीक विम्याचे नियम जैसे थे करून आणावे. मी त्यांचा जाहीर सत्कार करीत. शेतकऱ्यांसाठी राजकारण करू नये.
आंदोलनाच्या गोष्टी करू नये
त्यांची वाघाला लांडगे म्हणणाऱ्यांची पत तरी आहे का ? त्यांची (भाजपची) सर्व फाटाफूट झाली आहे. काहीतरी अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांची धडपड आहे. आमचा जन्म आंदोलनासाठी आहे. स्थितीत आमचा जन्म आंदोलनात झाला आहे. शिंगाडे मोर्चे, आंदोलन करणे आमचा धंदा त्यांचा धंदा नाही. त्यांनी आंदोलनाच्या, शिंगाडे मोर्चाच्या गोष्टी करू नये.
तर मंत्री पदाचा राजीनामा देईन
म्हणाले, की वाघाला लांडगे म्हणणाऱ्यांची पत तरी आहे का त्यांनी समोर येवून बोलावे. केळीच्या पीक विम्यात एक लाखासाठी ६५ हजार भरावे लागणार आहे. असे कोणी भरणार आहे का ? हे निकष त्यांनी बदलवून आणावेत. केंद्रात तुमचे सरकार आहे. तिकडे तुमची बोंब तिकडे पाडा ना. मतांसाठी राजकारण करू नका. पीक विमा निकष बदलविण्यात आम्ही पाठपुरावा केला नाही असे समोर येऊन बोलून दाखवावे. मी मंत्रीपदाचा राजीनामा देईल नाही तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा.
संपादन- भूषण श्रीखंडे