esakal | मुसळधार पावसाने शहर 'पाणीदार' 
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain

पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगदा, वाघनगरच्या पुढील रेल्वे बोगद्याखाली प्रचंड पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण झाली. 

मुसळधार पावसाने शहर 'पाणीदार' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहराला गुरुवारी (ता. २३) दुपारी जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढले. तासभर झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. वाहधारकांसह हॉकर्स, व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली. 
काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. कमी- अधिक प्रमाणात रोज पाऊस हजेरी लावतोय. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. दीड तास पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगदा, वाघनगरच्या पुढील रेल्वे बोगद्याखाली प्रचंड पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण झाली. 
 
दुभाजकामुळे घरांमध्ये पाणी 
थोडाही पाऊस झाला तरी रस्त्यांवर फूटभर पाणी साचते, असे भाग शहरात बरेच आहेत. त्यात मोहाडी रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. या रस्त्यावर डी- मार्टच्या पुढे नयनतारा रेस्ट हाऊससमोर दुभाजक टाकले आहेत. दुभाजकामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड पाणी साचते. या पाण्याचा निचरा व्हायला जागा नाही. त्यामुळे पाणी थेट घरांपर्यंत पोचले. नागरिकांच्या कंपाउंडमध्ये पाणी शिरल्याने गोंधळ उडाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करण्याची मागणी लावून धरली आहे. 

loading image