खाली सुरू होती वटपौर्णिमेची तयारी...तो वरती गेला अन्‌ आलाच नाही 

sucide
sucide
Updated on: 

जळगाव : शहरातील जुना खेडी रोड परिसरातील ज्ञानदेव नगरातील संतोष रामदास पाटील (माळी) (वय 38) या युवकाने राहत्या घरात पंख्याला सुताच्या सहाय्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. ही घटना आज सकाळी 8.30 वाजेच्या पूर्वी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जूना खेडी रोड परिसरातील सुनंदिनी पार्कमधील ज्ञानदेव नगरात संतोष रामदास पाटील (माळी) हे पत्नी व आईसोबत वास्तव्यास होते. त्यांची सोनल टेंन्ट हाऊस म्हणून लग्नाकार्यासाठी लागणारे साहित्याचे दुकान होते. आज सकाळी साडेआठ वाजेपूर्वी कुटूंबियाना बाथरुमला जावून येतो असे सांगून संतोष पाटील हे घराच्या वरच्या मजल्यावर गेले. त्यानंतर त्यांनी घरातील पंख्याला सुताने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराचवेळ झाला तरी पती बाथरुमवरुन का आले नाही हे बघण्याठी त्यांची पत्नी या वरच्या मजल्यावर आल्या. परंतू दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांचे लक्षात आले. 

दरवाजा तोडल्यानंतर उघडकीस आली घटना 
घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे समजताच संतोष यांच्या पत्नीने त्याच परिसरात राहणाऱ्या त्यांच्या चुलत भावाला बोलविले. त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता त्यांना घरात संतोष यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. हे बघताच त्यांच्या पत्नीसह कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. 

पोलिसांची घटनास्थळी धाव 
या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे, अश्‍विन हडपे, रवी पवार यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणी सचिन महाजन यांच्या खबरीवरुन शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामूळे केली याबाबत कुठलीही माहिती पोलिसांना मिळून आली नाही. पुढील तपास अभिजीत सैंदाणे कहे करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Four Suspects Held by Jalgaon Police
Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Marathi News Esakal
www.esakal.com