esakal | जळगावकर सावधान ः शहरात कोरोनाचे नविन 28 रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

जळगावकर सावधान ः शहरात कोरोनाचे नविन 28 रुग्ण

जळगावात पून्हा चिंता वाढली असून महापालिका व पोलिस प्रशासनाकडून मास्क न लावणारे नागरिक, दुकानदार आदींवर कारवाई करत असली तरी नागरिक अजून ही निष्काळजी पणे वागत असल्याचे चित्र आहे.

जळगावकर सावधान ः शहरात कोरोनाचे नविन 28 रुग्ण

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत रुग्णसंख्यावाढीचे चित्र असताना शनिवारी (ता. २१) पुन्हा आज आकडा वाढला आहे. शनिवारी प्राप्त अहवालांत नवे जिल्ह्यात ५९ बाधित आढळून आले असून जळगाव शहरात २८ नविन बाधित आल्याने चिंता वाढली आहे. तर ३५ रुग्ण दिवसभरात बरे झाले. तर आज मात्र एका ही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग दोन महिन्यांपासून बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मात्र, दिवाळीमुळे बाजारात झालेल्या गर्दीने पुन्हा कोरोना रुग्ण वाढण्याची व दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढल्याचे दिसले. मात्र, शुक्रवारी मात्र रुग्ण कमी झाले होते. मात्र चाचण्या वाढू लागल्याने आज ५९ नविन बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५४ हजार ४८ रुग्ण संख्या आहे. तर दिवसभरात ३५ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांची संख्या ५२ हजार ३६५ झाली आहे. शनिवारी मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २७, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ११, अमळनेर ३,  यावल४,  जामनेर ३, रावेर ३, पारोळा ४, बोदवड १, इतर १.

चिंता वाढली
जळगाव शहरात कोरोनाची दुसरी लाट आता वाढू लागली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दिवाळीत बाजारात झालेली गर्दी तसेच सुट्टीमध्ये बाहेरगावी जाणे, बाहेरगावावरून येणारे पाहूण्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात नागरिक देखील बिनधास्त तोंडाला मास्क न लावता बाजारात अजून देखील फिरत असल्याने जळगावात पून्हा चिंता वाढली आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाकडून मास्क न लावणारे नागरिक, दुकानदार आदींवर कारवाई करत असली तरी नागरिक अजून ही निष्काळजी पणे वागत असल्याचे चित्र आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे