Indian Woman
Indian Woman Indian Woman

भारतीय महिला दक्षिण आफ्रिकेतही भागवतांय कोरोनाग्रस्त कुटूंबाची क्षुधा

Indian Woman Help News:सध्या दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढली असून, कडक लॉकडाउन सुरू आहे.

जळगाव : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या ( corona third wave ) तीव्रतेत तिथे स्थित भारतीय कुटुंबातील (Indian family) महिलांनी कोरोनाग्रस्त कुटुंबीयांसाठी निःशुल्क भोजन पुरविण्याची जबाबदारी स्वीकारलीय. विशेष म्हणजे, या महिलांचे नेतृत्व करणारी तरुणी खानदेशातील (Khandesh) आहे. पंधरा तरुणींच्या या सेवाकार्याचे सध्या जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) कौतुक होतेय.

(indian women help by food a coronated family in south africa)

Indian Woman
जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार


भारतीयांच्या सेवावृत्तीला जगात तोड नाही, असं मानलं जातं. व्यवसायाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही स्थायिक झालो तरी भारतीय ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ या संकल्पनेतून सेवाकार्यासाठी समर्पित असतात. त्याचा प्रत्ययही वारंवार येत असतो.

आफ्रिकेत कोरोनाची लाट तीव्र

सध्या दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता वाढली असून, कडक लॉकडाउन सुरू आहे. या काळात राजधानी जोहान्सबर्गमध्ये कोरोनाबाधित व्यक्तींच्या कुटुंबांना बाहेर पडणे कठीण असताना त्यांच्यासाठी घरपोच भोजनाची निःशुल्क सेवा पुरविण्याची जबाबदारी काही भारतीय महिलांनी स्वीकारली आहे. पंधरा जणांच्या या टीममध्ये पाच महिला समन्वयक असून, खानदेशी तरुणी त्यांचे नेतृत्व करतेय.

Indian Woman
सेनेचं नवनेतृत्व..दादांचा वारस अन्‌ लढ्ढांचे कार्यालय!

गरजेतून सुरू झाली सेवा
धुळे येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रशांत व पूर्वांजली जोशी हे दांपत्य मुलगा व मुलीसह जोहान्सबर्गमधील सॅन्टन भागात वास्तव्यास आहेत. महिनाभरापूर्वी पूर्वांजली यांनी त्यांच्या वसाहतीतील दोन कोरोनाग्रस्त कुटुंबाना भोजनाचे पार्सल पुरविण्यापासून या सेवेचा श्रीगणेशा केला.

रोज दोनशे पाकिटांची व्यवस्था
उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर अन्य भारतीय महिलाही त्यात जोडल्या गेल्या. गरजू कुटुंबाकडून पार्सलसाठी मागणी वाढू लागली. महिनाभरापासून ही सेवा सुरू असून, आता त्याची व्याप्ती दररोज दोनशे पाकिटांपर्यंत पोचली आहे. केवळ भारतीय कुटुंबच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकन व अन्य देशांमधील कुटुंबांसाठीही या महिला ही सेवा पुरवित आहेत.

एकवेळचे भोजन
या उपक्रमात रुग्ण असलेल्या कुटुंबास घरपोच एकवेळचे भोजन पुरविले जाते. त्यात वरण-भात, पोळ्या, भाजी, सलाड, फळ (विशेषत: व्हिटॅमिन ‘सी’चे संत्री, मोसंबी), ग्रीन टी याचे पाकीट दिले जाते. लॉकडाउनमुळे रात्रीचे जेवण वितरित करणे शक्य नसल्याने दुपारच्या जेवणात थोडे जास्त पदार्थ दिले जाते.

Indian Woman
नंदुरबार जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर पाऊस जोरदार बरसला

इंडिया क्लबची मदत
भारतीयांच्या विविध उपक्रम, कार्यक्रमांसाठी याठिकाणी इंडिया क्लब म्हणून संघटना कार्यरत आहे. या सेवाकार्याची माहिती झाल्यानंतर क्लबनेही त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. पूर्वांजली यांच्यासोबत प्राची गुप्ता, रश्‍मी हरिभट, हर्षदा सिद्धापूर, स्मृती, त्रिवेणी, निशी, ज्योती, शिना व टीना आदी महिला या सेवाकार्यात योगदान देत असून, त्यांच्या या सेवाकार्याचे कौतुक होतेय.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com