जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाची तीन महिन्यातील सर्वात निचांकी रुग्ण संख्या

जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाची तीन महिन्यातील सर्वात निचांकी रुग्ण संख्या
Updated on

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या होत असतांना गुरूवारी अचानक नविन कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. त्यात आज तीन महिन्यातील सर्वात निचांकी नविन रुग्ण आल्याची संख्या आल्याने मोठा दिलासा जळगाव जिल्ह्याला मिळाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात केवळ १२१ नविन बाधित रुग्ण आढळले तर जळगाव शहरात केवळ अकरा तर काल मुक्ताईनगर येथे १४१ रुग्ण संख्येवरून केवळ दोन बाधित तर जामनेर मध्ये देखील केवळ अकरा रुग्ण संख्या आज आली आहे. तर आज ४५४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत असून, रुग्ण बरे होऊन घरी जाणे, तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे दिसत आहे; त्यात गुरूवारी मात्र कोरोनाचा बाधितांचा आकडा दुप्पट आल्याने आरोग्य तसेच प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज थेट तिन महिन्यातील सर्वात निचांकी रुग्ण संख्या आल्याने मोठा दिलासा जळगाव जिल्ह्याला मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात १२१ नवे बाधित रुग्‍ण आढळल्‍याने एकूण रुग्णसंख्या ५० हजार ७८६वर पोचली आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण मात्र दुप्पट असून, बुधवारी ४५४ जण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आता बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ४६ हजार २२९ वर पोचली आहे. सद्यःस्‍थितीत चार हजार ८५३ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९१.०३ टक्क्यांवर आला आहे. 

असे आढळले रुग्‍ण 
जळगाव शहर ११, भुसावळ २८, अमळनेर ११, चोपडा १६, धरणगाव ३, यावल ६, एरंडोल २, जामनेर ११, रावेर ६, पारोळा १, चाळीसगाव २२, मुक्‍ताईनगर २, बोदवड १ व इतर जिल्ह्यातील १ अशा रुग्‍णांचा समावेश आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com