esakal | चोपडा तालुक्यातील सातपुडा डोंगरामध्ये प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

चोपडा तालुक्यातील सातपुडा डोंगरामध्ये  प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात

चोपडा तालुक्यातील सातपुडा डोंगरामध्ये प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

चोपडा : तालुक्यातील वर्डी शिवारात गावापासून जवळपास ८ ते १० किमी अंतरावर सातपुडा डोंगर रांगा मध्ये राम तलावाच्या पुढे दि १६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दुर्घटना घडली असून यात विमान पायलट याचा मृत्यू झाला असून वैमानिकचे प्रशिक्षण घेणारी महिला गंभीर जखमी झाली असल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील उत्तर भागातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये वर्डी गावाच्या उत्तरेस आज दि १६ रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिरपूर येथील डोकोटा कंपनीचे प्रशिक्षणार्थी चार आसनच्या विमानात कॅप्टन नूर उल अमीन (२८,रा बंगलोर)हे आपल्या शिकाऊ विमानात अंशीका लखन गुर्जर( २४,रा खरगोन) हिला वैमानिकचे प्रशिक्षण देत असतांना सदर विमान दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक वर्डी शिवारात गावापासून जवळपास ८ ते १० किमी अंतरावर पर्वत रांगांच्या पायथ्याशी कोसळले.या दुर्घटनेत विमानाचे पायलट नूर उल अमीन हे जागीच मृत झाले तर शिकाऊ वैमानिक विमानात अंशीका लखन गुर्जर ही गंभीर जखमी झाली.


डोंगराळ भागात विमान कोसळले

चोपडा तालुक्‍यातील वर्डी शिवार असलेला भाग हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्‍या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास झाली.दुर्घटनेचे ठिकाण डोंगराळ भागात असल्याने तेथे कुणीही पोहचू शकत नव्हते.

आदिवासी युवकांची धाव..

आदिवासी परिसर असल्‍याने येथील आदिवासी बांधव व वर्डी गावातील काही युवक यांनी अक्षरशः झोळी करून अंशीका लखन गुर्जर या जखमी युवतीला रुग्णवाहिकेपर्यंत आणले जखमी महिला पायलटला बाहेर काढून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले तेथे डॉ राहुल पाटील यांनी उपचार केले. घटना घडल्यानंतर डॉ मनोज पाटील यांनी तात्काळ सोनू आठवण ,सागर बडगुजर ,भागवत चौधरी यांना रुग्ण वाहिक घेऊन घटनास्थळी दाखल होण्याचे संगितले.

घटनास्थळी प्रशासनाची तत्काळ धाव
घटनास्थळी दाखल घटना घडल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे,तहसिलदार अनिल गावित ,नायब तहसिलदार राजेश पउळ,उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ मनोज पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,डॉ कांतीलाल पाटील,शहर पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण,अडावद सपोनि किरण दांडगे,हे दाखल झालेत.

loading image