प्राणघातक हल्‍ल्‍यात माजी महापौरांच्या मुलाचा मृत्‍यू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २५) हा नेहमीप्रमाणे हॉटेलवर असताना त्याच्यावर परिसरातील काही गुंडांनी मार्च रात्री बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास शस्त्रांनी हल्ला चढवला.

जळगाव : जळगाव शहरात रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेल बाहेर माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मध्यरात्री हल्लेखोरांनी राकेश सपकाळे याच्यावर केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २५) हा नेहमीप्रमाणे हॉटेलवर असताना त्याच्यावर परिसरातील काही गुंडांनी मार्च रात्री बारा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास शस्त्रांनी हल्ला चढवला. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती मिळाली. घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक गुन्हे शाखेचे प्रभारी यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला. उशिरापर्यंत घटनास्थळावर पंचनामा आणि जाब जबाब माहिती घेण्याचे काम सुरू होते. माजी महापौर पुत्राचा खून झाल्याने शिवाजीनगर गेंदालाल मिल आणि रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र झाल्याने पोलिसांना गस्त वाढवावी लागली परिसरात रात्री पोलिस तैनात करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon late night murder ex mayor son