अरे व्वा ! दारूबंदी करणाऱ्या गावाला ५१ लाख रुयांचा निधी !

उमेश काटे
Saturday, 23 January 2021

महिलांमधून ५० टक्के आरक्षण मिळालेले आहे त्यांना संधी मिळेल. चांगले काम करणाऱ्या सरपंचांची दखल घेतली जाईल.

अमळनेर : दारूबंदी करणाऱ्या गावाला ५१ लाख रुपयांचा निधी आपण वेगळ्या स्तरावर मिळवून लोकाभिमुख विकासासाठी वापरू, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सत्कार सोहळ्यात केले. जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग झाला असून, एकाच व्यासपीठावर तालुक्यातील सर्व नवनियुक्त सदस्यांचा गौरव झाला.
 

आवश्य वाचा- पट्टेदार वाघाच्या आजही आढळल्या पाऊल खुणा !
 

व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष गजानन गव्हाणे, सेनेचे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, हिंमतराव पाटील, पंचायत समितीचे राजेंद्र पाटील, दळवेलचे रोहिदास पाटील, चंद्रकांत पाटील, जितेंद्र पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, गोकूळ बोरसे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, डॉ. किरण पाटील, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, बाजार समिती माजी सभापती किसन पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील, सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, कविता पाटील, आशा शिंदे, भारती शिंदे, अलका पवार, शिवाजीराव पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, युवक तालुकाध्यक्ष बाळू पाटील, युवक तालुकाध्यक्ष विनोद पाटील, गौरव पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अर्बन बँक चेअरमन अभिषेक पाटील यांची निवड तर आणि व्हाइस चेअरमन प्रवीण पाटील यांचा गौरव करण्यात आला. 

आवर्जून वाचा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वता:ला जमीनीत गाडून केले आत्मक्लेश आंदोलन
 

चांगल्या काम करणाऱ्यांची दखल घेतली जाईल

आमदार पाटील म्हणाले, की आमदारपदासाठी सर्वसामान्य माणूस स्वतः समजून या तालुक्याने काम केले. त्यातून २१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. महिलांमधून ५० टक्के आरक्षण मिळालेले आहे त्यांना संधी मिळेल. चांगले काम करणाऱ्या सरपंचांची दखल घेतली जाईल. बिनविरोध १९ ठिकाणी २५ लाखांचा निधी देऊ केलेला होता. त्यापैकी १५ लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरवणी यादीतून ३ कोटी रुपयांची मागणी करून उपलब्ध केला जाणार आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील म्हणाले, की जिल्ह्याचा विकास करणे आघाडीचे कर्तव्य आहे. जिल्हा परिषदेत गावाच्या विकासासाठी प्रस्ताव पाठवा, नियोजन करा. स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आदी सुविधांवर भर द्या, असे आवाहन केले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon MLA anil patil fifty one lakh fund to the boycotting village