गिरीश महाजन समर्थकांचा जामनेरात मोर्चा; पत्नी साधना महाजन ही रस्त्यावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

गिरीश महाजन समर्थकांचा जामनेरात मोर्चा

Bजळगाव : विधानसभेत (Assembly) सोमवारी ओबीसी आरक्षणच्या (OBC reservation) मुद्द्यावर झालेल्या गोंधळात भाजपचे (BJP) १२ आमदारांचे निलंबण करण्यात आले. यात जामनेरचे आमदार तथा भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा देखील समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज जामनेर येथे आमदार महाजन यांच्या पत्नी तथा जामनेर नगरपालिका नगराध्यक्ष साधना महाजन (Mayor Sadhana Mahajan) या भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन केले. (mla girish mahajan supporters staged agitation in jamner)

BJP

BJP

ओबीसी राजकीय आरक्षणाचा ठरावरून काल विधानसभेत भाजपा आमदारांनी आवाज उठवला. त्यावेळी झालेल्या गोंधळामूळे विधानसभेत १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबण केल्याचा ठराव करण्यात आला. याबाबत भाजपातर्फे राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचे सांगितले. त्यानुसार आज जामनेर येथे बाबाजी राघो मंगल कार्यालय पासून मोर्चाला सुरवात झाली. नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी भाजपा तालुकध्यक्ष , न. पा. गटनेते, सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने आ. गिरिश महाजन यांचे समर्थन करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यकर्त्यांनी वाहने आडवले

जामनेर येथे भाजपातर्फे सकाळी झालेल्या आंदोलना प्रसंगी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी संतप्त भाजप कार्यर्त्यांनी यावेळी वाहने आडवून आंदोलन केले. तसेच एसटी महामंडळाची बस देखील आडवून बसवर चढून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

तहसीलदारांना निवेदन दिले.

तहसील कार्यालयात दुपारी मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन व भाजप पदाधिकारी यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधाबाबतची निवेदन तहसीलदारांना दिले.