महाजनांचे सेवेकरी प्रशासनातून हटवा.."एनएसयूआय'चे टोपेंना निवेदन ! 

महाजनांचे सेवेकरी प्रशासनातून हटवा.."एनएसयूआय'चे टोपेंना निवेदन ! 

जळगाव  : जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे सेवेकरी म्हणून कार्य करीत आहेत. त्यामुळेच "कोविड'ची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या सेवेकऱ्यांना हटविल्यास "कोरोना' आटोक्‍यात येईल, असे निवेदन जिल्हा "एनएसयूआय'चे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कधीकाळी ग्रीन झोन मध्ये असलेला जळगाव जिल्हा अचानक इतक्‍या रेडझोनच्या अतिगंभीर परिस्थितीमध्ये कसा गेला? संपूर्ण जिल्हाभरातून सर्व नागरिकांची एकच ओरड सुरू असताना देखील प्रशासन हेतुपुरस्सर जिल्ह्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्‍टर खैरे हे प्रमुख लोक मात्र जनतेची सेवा न करता माजी मंत्री गिरीश महाजन यांची सेवा करत असून त्यांचे आदेश पाळत हेतुपुरस्सर जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वाट बघत आहे. 105 आमदार निवडून येऊन देखील सत्तेपासून बाहेर राहावे लागत असल्याच्या रागा पोटी माजी मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा विसरून गेले की आपण जळगाव जिल्ह्याचे नागरिक आहोत. परंतु सत्तेच्या लालसेपोटी व राजकारण करण्याच्या हेतूपोटी जिल्ह्याच्या नागरिकांच्या जिवाशी खेळत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकत जिल्ह्याची परिस्थिती मुद्दाम हाताबाहेर जाऊ देण्याचे कटकारस्थान करत असल्याचे दिसून आले आहे, जेणेकरून महाविकास आघाडी सरकारवरती ताशेरे ओढता येतील व सरकारला अडचणीत आणता येतील या उद्देशाने भाजपचे माजी मंत्री या पद्धतीचे माणुसकीहीन कार्य करीत आहेत. 

आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री येत असल्यामुळे जिल्हाधिकारी व प्रशासनाने आपल्या भोंगळ कारभाराला लपविण्यासाठी ऐनवेळी जिल्हा परिषद सीईओ बी. एन. पाटील यांची कोविड रुग्णालयाच्या प्रशासक अधिकारीपदी नेमणूक केली असल्याचा आरोपही या पत्रकात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील या माजी मंत्र्याच्या सेवेकऱ्यांना पदावरून तत्काळ हटविले तरच खऱ्या अर्थाने जळगाव जिल्हा कोरोना मुक्त होईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com