जळगाव जिल्ह्यात पावसाची अद्याप माघार नाही 

जळगाव जिल्ह्यात पावसाची अद्याप माघार नाही 

जळगाव  ः शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला. दोन वर्षांतील उच्चांक १३३ टक्के पावसाने यंदा गाठला आहे. गेल्या शनिवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. कडक ऊनही पडत आहे. मात्र, आता पाऊस आला, तर तो सर्वच पिकांना मारक ठरणारा आहे. त्यातच गुरूवारी, शुक्रवारी ढगाळ वातावरण असेल आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे. 

गेल्या शनिवारपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांना सूर्यप्रकाश भरपूर मिळत आहे. यामुळे कपाशीला जी बोंडे अर्धवट फुटण्याच्या अवस्थेत होती, ती फुटण्याच्या तयारीत आहेत. ज्वारी अनेक ठिकाणी काळी पडली असली, तरी सूर्यप्रकाशामुळे तिचा पोत सुधारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता पाऊस नकोच असे शेतकऱ्याना वाटू लागले आहे. सर्वच धरणे, नद्या, नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे सिंचनाची मोठी सोय होईल. यंदा पाऊस दमदार झाल्याने थंडीचा कडाका अधिक असणार आहे. यामुळे आगामी रब्बी चांगला येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात १३३ टक्के पाऊस 
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या १३३ टक्के पाऊस झाला आहे. २०१९ ला १२२ टक्के पाऊस झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी पावसाने शंभरी ओलांडली आहे. २०१५ ला ६३ टक्के, २०१६ ला ९३, २०१७ ला ७२, २०१८ ला ६५ टक्के पाऊस झाला होता. २०१५ ते २०१८ ही चार वर्षे दुष्काळीच ठरली होती. मात्र, २०१९ पासून चांगला पडत असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नसल्याचे चित्र आहे. 

पावसाने उघडीप दिली असली तरी आज, उद्या पावसाचा अंदाज आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातही पाऊस होईल, असे आतापर्यंतच्या स्थितीवरून लक्षात येते. मात्र, येणारा संभाव्य पाऊस हा नुकसानकारक नसेल, हे नक्की. 
- नीलेश गोरे, 
हवामान तज्ज्ञ 
 

तालुकानिेहाय पाऊस 

तालुका टक्केवारी 
जळगाव १२४.५ 
भुसावळ १३८.४ 
यावल १२०.९ 
रावेर १२८.० 
मुक्ताईनगर १४५.० 
अमळनेर १३८.५ 
चोपडा १३८ 
पारोळा १३४.५ 
चाळीसगाव १२९.४ 
जामनेर १३७.० 
पाचोरा १५०.९ 
भडगाव १२७.९ 
धरणगाव १११.७ 
बोदवड १२९.३ 

सरासरी १३३.५ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com