जळगाव जिल्ह्यात मॉन्सूनचा पाऊस २० जूननंतरच !

चांगला पाऊस पडल्यानंतरच पेरण्याचे नियोजन शेतकऱ्यांचे आहे.
जळगाव जिल्ह्यात मॉन्सूनचा पाऊस २० जूननंतरच !



जळगाव ः मध्य प्रदेशात जोरदार मॉन्सून (Monsoon) झाल्याने तापी नदीला पूर येऊन त्याचे पाणी हतनूर (ता. भुसावळ) धरणात (Hatnur Dam) जमा झाले. धरणाची पाणीपातळी वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडावे लागले आहेत. एकीकडे असे चित्र आणि दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात दमदार मॉन्सूनचे आगमन अद्याप झालेले नाही. जूनचे तेरा दिवस उलटले तरी पेरण्यायोग्य पाऊस (Rain) नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस २० जूननंतरच येईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी (Meteorologist) व्यक्त केला आहे. (monsoon rains in jalgaon district after twenty june)

पावसाने ओढ दिली असली तर वाऱ्याचा वेग २४ ते ३० किलोमीटर प्रतितास असा आहे. यामुळे मॉन्सूनला पोषक वातावरण तयार हेात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जूनच्या पूर्वी शासनाच्या हवामान विभागाने १ जूनला मॉन्सूनचे राज्यात आगमन होऊन ४ जूननंतर महाराष्ट्रात येईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र मॉन्सून ३-४ जूनला केरळमध्ये दाखल झाला. मुंबई, कोकण, विदर्भ, मध्य प्रदेशात मॉन्सून सक्रिय झाला. तेथे दमदार पाऊसही होत आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात मात्र मॉन्सूनने दमदार हजेरी लावली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशीच्या पेरण्या केल्या. मात्र कोरड वाहू शेतकऱ्यांनी वखरणीची कामे केली आहेत. चांगला पाऊस पडल्यानंतरच पेरण्याचे नियोजन शेतकऱ्यांचे आहे.

हवामानतज्ज्ञांच्या मतानुसार पूर्वी १४ जूननंतर जिल्ह्यात दमदार पावसाचे संकेत होते. मात्र हवामान रोज बदलते आहे. जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे तापमानाचा पारा कमी होतो आहे. दुसरीकडे दुपारी असह्य उकाडाही होत आहे. तरीही आकाशात मॉन्सूनचे ढग दिसत नाही. तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे. वातावरणातील बदलामुळे पाऊस २० जूननंतरच जळगाव जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सक्रिय होईल, असा अंदाज आहे. तोपर्यंत पावसाची वाट पाहावी लागेल. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर जुलै, ऑगस्टमध्ये दमदार पावसाचा अंदाज आहे.
दिवसभरात कधी वाऱ्याचा वेग २४ ते ३० किलोमीटर प्रतितास, तर कधी अतिशय दहा ते १५ किलोमीटर प्रतितास असतो. सकाळी सहा ते दहादरम्यान वाऱ्याचा वेग असतो.



हवामानातील बदलामुळे पावसाचे ढगनिमिर्तीची प्रक्रियाही बदलते. पूर्वी १४ नंतर जिल्ह्यात पावसाचे ढग निर्माण होण्याची चिन्हे होती. आता ती चिन्हे २० जूननंतर दिसत आहेत. यामुळे २० जूननंतरच मॉन्सूनचे दमदार आगमन होईल, असा अंदाज आहे.
-नीलेश गोरे, हवामान अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com