esakal | कोकणच्या धर्तीवर जळगावच्या अतीवृष्टी बाधितांना मदत करा-खासदार पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

MP Unmesh Patil

कोकणच्या धर्तीवर जळगावच्या अतीवृष्टी बाधितांना मदत करा-खासदार पाटील

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी (Heavy Rain) झाल्याने शेकडो पशुधन मृत्युमुखी पडले आहे. तर हजारो एकर शेती, शेतशिवाराचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच शहरातील नदी किनाऱ्यावरील जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापाऱ्यांचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुराची भिषणता बघून तातडीने कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतीवृष्टीत नुकसान (Flood Damage) झालेल्या बांधितांना मदत करण्याची मागणी खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

हेही वाचा: ब्रेकिंगः जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये ६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

अनेक गावे बाधित

आज चाळीसगाव तालुक्यातील वाकडी, वाघडू, जामडी, जावळे, लोंजे, बाणगाव, सर्वाधिक बाधित रोकडे या डोंगर पट्ट्यातील गावात पाण्याने हाहाकार झाला आहे. शेकडो पशूधन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेले तर अनेक जनावरे खुटयावर मृत्युमुखी पडली आहे. शेतांमध्ये पाणी घुसल्याने हजारो एकर शेती जमिनीला नुकसान झाले आहे. शेतांचे बांध वाहून गेले तसेच ग्रामीण भागातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स, तसेच दयानंद जवळील मेजरनाना कॉम्पलेक्स मध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर शिवाजीघाट ते शनिमंदिर या परिसरातील दुकानदारांना या पर्जन्यवृष्टीने लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आज या परिसराची पाहणी रात्री उशिरापर्यंत खासदार उन्मेश पाटील यांनी केली.

कोकणच्या धर्तीवर मदत करा

जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतीवृष्टी झाली. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात शेती, पशुधन, व्यापारी, नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पुरग्रस्तांच्या मदत कोकणत्या धर्तीवरून अध्यादेश काढावे अशी मागणी खासदार पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ,राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

कन्नड घाटात प्रथमच कोसळल्या दरडी

कन्नड घाटात ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक वाहनधारक अडकले. आज सकाळपासूनच तेथे मदतकार्य सुरू झाले होते. तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे अधिकाऱ्यांना तातडीने येथे मदतकार्य सुरू करावे असे आदेश दिले खासदार पाटील यांनी दिले. तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी संपर्क करून तातडीने कन्नड घाटातील दरडी मोकळ्या करण्यासंदर्भात दूरध्वनीवर चर्चा केली. आज सकाळीच अकरा वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळावर राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण केले. तसेच पूर्ण घाटाचे खासदार पाटील यांनी पाहणी करून मदत कार्यात सहभाग घेतला.

राज्य सरकारने घटनेचे गांभीर्य लक्षात घ्यावे

चाळीसगाव ,पाचोरा, भडगाव यांचेसह जिल्हातील अनेक गावांना या पर्जन्यवृष्टीचा फटका बसला आहे. रोकडे गावात पाण्याचा प्रवाह गावात शिरल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. वाकडी, वाघडू, जामडी, जावळे, बाणगाव लोंजे या परिसराचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. नुकसानीमुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ हवालदिल झाला आहे. पंचनाम्याचा वाट न बघता तातडीने द्यावी अशी मागणी खासदारांनी केली आहे.

loading image
go to top