सफाई मक्तेदार, सुरेश जैनांच्या तैलचित्रावरून महासभेत ऑनलानईन गोंधळ

सफाई मक्तेदार, सुरेश जैनांच्या तैलचित्रावरून महासभेत ऑनलानईन गोंधळ

जळगाव  ः जळगाव शहरातील सफाईच्या मक्त्यावरून आज पून्हा ऑनलाईन महासभा गाजली. सभेत वॉटर ग्रेस कंपनीचा मक्ता बंद झाल्यानंतर तात्पुरत्या सुविधेसाठी एस. के. मक्तेदारला सफाई शहराचा मक्ता देण्यात आला. यावर देखील सभेतील सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित करत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. तसेच पून्हा वॉटर ग्रेस कंपनीचा मक्ता देण्यावरून देखील महासभेत सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित केली. तर महापालिकेतील भाजपचा सदस्यांमध्ये गटबाजी दिसून आली. तसेच माजी मंत्री सुरेश जैन यांच्या तैलचित्र सभागृहातून काढण्यात आल्यावरून देखील भाजप-शिवसेनात चांगलीच जुंपली. गदारोळ वाढल्याने शेवटी तीन वाजता महासभा दहा मिनीटासांठी महापौरांनी तहकुब केली. 

महापालिकेची महासभा महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत सुरवातालीच साफ सफाईच्या ठेक्यावरून दिड तास सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. तसेच मक्ता देण्यावरून प्रशासनाकडून सदस्यांना अंधारात ठेवण्याचा आरोप सदस्यांनी केले. प्रथम शिवसेना सदस्य विष्णू भंगाळे यांनी १३ नोव्हेंबरला पत्र देवून शहरात साफसफाई चांगल्या प्रकारे होत नसल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. तसेच वॉटर ग्रेस कंपनीला सफाई ठेका देवू नये असे सांगितले होते असे स्मरण करून दिले. तरी देखील वॉटर ग्रेसला निविदा देतांना अटी व शर्ती खाली ठेका देण्यात आला. याबद्दल भंगाळे यांनी नाराजी व्यक्त केली. सफाईवर बोलतांना शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा म्हणाले, की अतिशय तोकड्या कर्मचारी संख्या बळावर साफसफाई मक्तेदार करत आहेत. त्यात अनेक वाद झाले आता पून्हा या मक्तेदाराला शहराचा सफाईचा मक्ता देण्यात का आला असा प्रश्‍न उपस्थित करून प्रशासनाने भूमीका मांडण्याचे सांगितले. 

नियमांचे कुठे उल्लंघण झाले नाही-आयुक्त 
शहरात साफसफाईचा मक्ता वॉटर ग्रेस व एस. के. मक्तेदारावर वेळोवेळी परिस्थीती पाहून भूमीका कायदेशीर बाजू पाहुन घेतली आहे. यात महापालिकेच्या हिताचे निर्णय घेतले आहे असे आयुक्त सांगितले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शीका नुसार घनकचरा प्रकल्पा वेळोवेळी राज्य व केंद्र शासनाकडून परवानगी देण्यात आले आहे. त्यामुळे कुठे ही उल्लंघन झालेले नाही असे आयुक्तांनी सांगितले. 
 

भाजप सदस्यांमध्येच गट बाजी उघड 
आयुक्तांनी दिलेल्या खुलाश्‍यावर असमाधान व्यक्त करत सदस्य समाधानी नसून या सगळ्यात संशयास्पद भूमीका आहे. यामुळे प्रशासनावर अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची वेळ येवू देवू नये अशी काळजी घ्या असे ॲड. हाडा यांनी सांगितले. मात्र सत्ताधारी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आयुक्तांना चार महिनेच झाले असून त्यात कोरोनाचा संकटात देखील कामे सुरू आहे. त्यांच्यावर इतक्यात अविश्‍वास न दाखवता या विषयावर पक्षाच्या बैठकीत चर्चा करावी. असे कैलास सोनवणे यांनी सांगितले. परंतू यावर भाजपच्या अनेक सदस्यांमध्ये एकमत नसल्याचे यावेळी महासभेतील चर्चे दरम्यान दिसून आले. तर भाजप गटनेते भगत बालाणी यांनी ॲड. हाडा यांनी त्यांचे वैयक्तीक मत मांडले आहे हे मत पक्षाचे नाही असे सांगितले त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधाऱयांमध्ये गटबाजी दिसून आली.   

सुरेश जैन तैलचित्र हटविण्याच्या मुद्यावरुन खडाजंगी
माजी मंत्री सुरेश जैन यांचे तैलचित्र कोणत्या कलमाच्या अधिनीयमात काढले याचा खुलासा द्यावा असे सांगून प्रशासनाला शिवसेना सदस्य लढ्ढा यांनी धारेवर धरले. यावेळी मनपा अधिकारी डी. एस. खडके यांनी कोणत्या नियमानुसार तैलचित्र काढले हे सांगता येत नाही असे सांगितले. मात्र लढ्ढा यांच्यासह शिवसेना नगरसेवकांचे समाधान झाले नाही त्यांनी प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावे अशी मागणी लावून धरली. यावर भाजपचे गटनेते बालाणी यांनी नंतर चर्चा करावी असे सुचविले. मात्र आमच्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे अन्यथा आदरपुर्वक तैलचित्र लावावे अशी मागणी शिवसेना सदस्यांनी केली. त्यावरून भाजप व शिवसेनेच्या सदस्यांची खडाजंगी झाली. यावेळी महापौरांनी आपण आयुक्तांसोबत चर्चा करू सांगितल्यावर देखील शिवसेनेने गोंधळ सुरूच ठेवला. यावेळी कैलास सोनवणे यांनी सभा दहा मिनीटांसाठी सभा तहकुब करण्याची मागणी केली. याविषयावर शिवसेनेचे विरोधीपक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, इबा पटेल, विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे तर भाजपाचे कैलास सोनवणे, भगत बालाणी यांच्यात खडाजंगी झाली.  
 

तर शिवसैनीक तैलचित्र लावणार- महाजन
एकादा व्यक्ती चाळीस वर्ष समाजकारणात घालवतो. प्रशासनाला थोडी तरी लाज वाटेत असेल तर त्यांनी हे चित्र पून्हा लावावे. अन्यथा हे चित्र सर्व  शिवसेना नगरसेवक शिवसेना स्टाईलने सभागृहात लावतील असा इशारा सुनिल महाजन यांनी दिला. तर गटनेते अनंत जोशी यांनी देखिल तैलचित्र सन्मानपुर्वक लावण्याची मागणी केली.

नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली
शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. महासभा सुरू असल्याने आता यासंदर्भात चर्चा करता येणार नाही. त्यामुळे गुरूवारी याबाबत चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे तैलचित्र लावण्याच्या वादावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com